पान 4- पोस्टगावगिरी
By admin | Published: August 26, 2015 12:19 AM2015-08-26T00:19:04+5:302015-08-26T00:19:04+5:30
पोस्ट गावगिरी : नेरूल
Next
प स्ट गावगिरी : नेरूलजगाला प्रेम अर्पावे..गोव्यातील ग्रामस्थांनी स्वातंत्र्यानंतर जवळपास 40 वर्षे धार्मिक सलोखा जोपासला होता. ईदच्यावेळी ख्रि?न व हिंदू बांधवाचा उत्साह ओसांडून वाहायचा. ख्रिसमसच्यावेळी हिंदू व मुसलमान आपला सण म्हणून साजरा करायचे, तर दिवाळी व गणपतीच्यावेळी मुसलमान आणि ख्रिश्चन हिंदू बांधवांना मिठाई द्यायचे. असा बंधूभाव मागील दहा वर्षांपासून थोडा कमी होत चालल्याचे दिसून येते. त्यात काही विघ्नसंतोषी माणसे द्वेष आणखीनच प्रज्वलित करीत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे नेरूलमधील डॉन बॉस्को कॉलेज. या ख्रिस्ती शिक्षण आस्थापनाने घेतलेल्या जमिनीत पूर्वांपार असलेले कालिमातेचे मंदिर कोणी नतद्रष्टाने रातोरात तोडले. हेतू हाच की हिंदू-ख्रि?नांमध्ये भांडणे व्हावी; परंतु सर्वधर्मसमभाव पाळणार्या नेरूलच्या हिंदू ग्रामस्थांनी तसा अर्थ लावू दिलाच नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे देवळासाठी सलग 48 तास चाललेल्या संघर्षात नेरूल पंचायतीचे तीन ख्रिस्ती पंच घटनास्थळी आलेच नाहीत. उरलेल्या चार पंचसदस्यांनी हा प्रo्न रेटून धरल्याने देवळाची पुनर्बांधणी मात्र पूर्ण झाली. यावरूनच गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडण्याचे काम गोव्यातील काही मोजक्या व्यक्ती करीत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले. जो धारणा करतो तो धर्म. समाजाची चुकीची धारणा करतो तो कोणताही धर्म असू शकत नाही. तो झाला अधर्म. सर्व धर्मांची हीच शिकवण आहे. माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म या धारणेने आपण जगूया. साने गुरुजींनी म्हटले आहे ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..’ नेरूलमधील घटनेने आपण एवढा धडा मनोमन जपूया त्यातच आपल्या सर्वांचे हित आहे.- दिनेश केळुस्कर