Big Breaking: दोन तासांच्या हायव्हॉल्टेज ड्राम्यानंतर सीबीआयने केली माजी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 09:49 PM2019-08-21T21:49:26+5:302019-08-21T22:03:24+5:30

सीबीआयची टीम पी. चिदंबरम यांच्या घरी दाखल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने चिदंबरम यांच्या घराबाहेर जमा झाले.

P Chidambaram taken away in a car by probe agency officials. | Big Breaking: दोन तासांच्या हायव्हॉल्टेज ड्राम्यानंतर सीबीआयने केली माजी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांना अटक

Big Breaking: दोन तासांच्या हायव्हॉल्टेज ड्राम्यानंतर सीबीआयने केली माजी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांना अटक

googlenewsNext

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आहे. जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना अटक केली आहे. २७ तासानंतर पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली. यानंतर ते जोरबाग येथील निवासस्थानी पोहचले. याठिकाणी सीबीआयची टीम दाखल झाली. गेल्या १ तासांपासून सीबीआयचे अधिकारी चिदंबरम यांच्या घरात ठाण मांडून होती. 

सीबीआयची टीम पी. चिदंबरम यांच्या घरी दाखल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने चिदंबरम यांच्या घराबाहेर जमा झाले. नरेंद्र मोदी सरकार सत्तेचा दुरुपयोग करून चिदंबरम यांना अडकविण्याचे प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. सीबीआयचे मुख्य संचालकही पी. चिदंबरम यांच्या घरी दाखल झाले. कार्यकर्त्यानी मोदी विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. यादरम्यान पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.  

२७ तासांनंतर बेपत्ता झालेले पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पी. चिदंबरम यांनी आयएनएक्स प्रकरणात मी कधीही आरोपी नव्हतो. माझ्यावर कोणतंही आरोपपत्र दाखल झालं नाही असा दावा केला आहे. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर पी. चिदंबरम हे जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यानंतर काही वेळातच सीबीआयची टीमही त्यांच्या घरी दाखल झाली होती.  

सीबीआय किंवा ईडीने कोणतंही आरोपपत्र दाखल केलेलं नाही, माझा मुलभूत हक्क हिरावला जातोय. मागील २७ तासांपासून अनेक भ्रम पसरविले जात आहेत. मी आणि माझं कुटुंब यात दोषी नाही. कोणत्याही आरोपपत्रात माझं नाव नाही. सुप्रीम कोर्टात याबाबत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी होईल. गेल्या २७ तासांत वकिलांसोबत पुढील लढण्याची तयारी करत होतो. रात्रभर कागदपत्रे तयार केली जात होती. तपास यंत्रणांही कायद्याचं पालन केलं पाहिजे असं चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

तसेच ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात काढलेली लुकआऊट नोटीस रस्ते परिवहन, हवाई दल आणि नौदलाला पाठवली आहे. त्यात चिदंबरम यांना ईडीच्या परवानगी शिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल सायंकाळपासून चिदंबरम यांचा कुठेच पत्ता लागत नाही. त्यामुळे ईडीने चिदंबरम यांचा शोध सुरू ठेवला होता. धक्कादायक म्हणजे चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी आयएनएक्स घोटाळ्यात मिळालेल्या लाचेच्या रकमेतून स्पेनमध्ये एक टेनिस क्लब आणि अमेरिकेत बंगला खरेदी केला आहे. त्याशिवाय कार्तीने देश-विदेशात अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केली. 

Web Title: P Chidambaram taken away in a car by probe agency officials.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.