पान 7- आदिवासी विकास परिषद सोहळा उत्साहात
By admin | Published: September 6, 2015 11:54 PM2015-09-06T23:54:54+5:302015-09-06T23:54:54+5:30
कुंकळ्ळी : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली आणि गोवा आदिवासी विकास परिषदतर्फे आयोजित गोवा आदिवासी विकास परिषद उद्घाटन सोहळा (दि. 5) सीडीओ पॅराडाइज सभागृह केपे येथे पार पडला. सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. तसेच माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसोझा यांना र्शद्धांजली वाहण्यात आली.
Next
क ंकळ्ळी : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली आणि गोवा आदिवासी विकास परिषदतर्फे आयोजित गोवा आदिवासी विकास परिषद उद्घाटन सोहळा (दि. 5) सीडीओ पॅराडाइज सभागृह केपे येथे पार पडला. सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. तसेच माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसोझा यांना र्शद्धांजली वाहण्यात आली.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोमजीभाई डामोर, माजी खासदार व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे अध्यक्ष जागन सिंग कुलासो, माजी मंत्री व एम. पी. उपाध्यक्ष अर्जुन मीना, प्रकाश शंकर वेळीप, यशवंतसिंग दरबार, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, सतीश वेळीप सचिव, सहसचिव दुर्गादास गावडे, खजिनदार अँथनी वाझ, सदस्य डॉ. उदय गावकर, सतीश भट, सतीश वेळीप व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रकाश वेळीप म्हणाले, शैक्षणिक, संस्कृती, आरोग्य, उद्योजक यासारख्या विकासासाठी राबवलेली परिषद आदिवासी जनतेसाठी महत्त्वाची पायरी आहे. या कार्यक्रमामुळे महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वासांना बळकटी मिळतात. गोव्यामध्ये ही परिषद आदिवासींच्या तरुण पिढीला प्रोत्साहन करण्यासाठी लाभदायक ठरेल, असे त्यांनी सांगितले.वासुदेव मेंग गावकर म्हणाले, सहकार क्षेत्रात आणि आदिवासी लोकांसाठी प्रकाश शंकर वेळीप यांचे मार्गदर्शन उल्लेखनीय आहे. प्रकाश वेळीप यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा आदिवासी (एससीएसटी) एक थरावर जाऊन पोचलेली आहे. यशवंत सिंग दरबार म्हणाले, आदिवासी विकास परिषदेच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी आदिवासी समाजासाठी प्रोजेक्ट चालू केले आहे. या प्रोजेक्टच्या साहाय्याने आदिवासी लोकांना नोकरी व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात साहाय्यता मिळेल. त्यामधून नोकरीची संधी निर्माण करण्यात येईल. या प्रोजेक्टमुळे आदिवासी समाजाला दिशा मिळेल. तसेच त्यांच्या विकासासाठी साहाय्यता मिळेल. तसेच पारंपरिक रीतीरिवाज, विकास विविध राज्यांमध्ये विविधता त्यांचे विचार भव्य विकासासाठी फायद्याचे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी राजस्थानचे खासदार अर्जुन मीना, सोमजीभाई डामोर यांनीही मनोगत व्यक्त केले.दरम्यान, अँथनी वाझ यांचा आदिवासी समाजामध्ये उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मानपत्र, पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन उदय गावकर यांनी केले. डॉ. वल्लभ फळदेसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)फोटो : केपे येथे आयोजित के लेल्या आदिवासी विकास परिषद सोहळ्यात उपस्थित मान्यवर.