दिल्लीत हालचालींना वेग
By admin | Published: October 30, 2014 12:42 AM2014-10-30T00:42:39+5:302014-10-30T00:42:39+5:30
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ हरियाणा आणि महाराष्ट्रावर कब्जा मिळविणा:या भाजपाला आता दिल्लीचे सिंहासन खुणावू लागले आह़े
Next
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ हरियाणा आणि महाराष्ट्रावर कब्जा मिळविणा:या भाजपाला आता दिल्लीचे सिंहासन खुणावू लागले आह़े दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपा नेतृत्वाने यथाशक्ती प्रयत्न चालवले आहेत मात्र काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचा मोठा दबाव आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खरडपट्टीने भाजपाच्या या प्रयत्नांतील हवा गुल झाली आह़े त्यामुळे दिल्लीत नव्याने निवडणुका घेण्याच्या पर्यायावरही भाजपात चिंतन सुरू झाले असले तरी सर्व राजकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस व आम आदमी पार्टीला दिल्लीत नव्याने निवडणुका हव्या आहेत़ तर भाजपाचे सरकार स्थापनेचे मनसुबे आहेत़ आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे दिल्लीत तीन जागांवर पोटनिवडणूक घेण्याची तयारी केली गेली आह़े महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर या तीन जागांही आपल्या झोळीत पडतील, असा विश्वास भाजपा बाळगून आह़े
7क् जागांच्या दिल्ली विधानसभेत भाजपाचे संख्याबळ 29 आह़े गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडण़ुकीत भाजपाने 7क् पैकी 32 जागा जिंकल्या होत्या़ दरम्यानच्या काळात दिल्लीचे तीन आमदार लोकसभेवर निवडून आल्याने भाजपाचे संख्याबळ आता 29 वर आले आहे. सरकार स्थापनेसाठी 36 चा जादूई आकडा हवा आह़े संख्याबळाअभावी भाजपाने प्रारंभी सरकार स्थापनेस नकार दिला होता़ दिल्लीतील सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना आणि यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व नायब राज्यपालांवर ताशेरे ओढल्यानंतर राजकीय सर्व स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत़ सत्तास्थापनेच्या शक्यता तपासण्यासाठी राज्यपालांनी राजकीय पक्षांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आह़े
4दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी कुठलाही राजकीय पक्ष वा पक्षांची आघाडी समोर न आल्यास येथे नव्याने विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकत़े
4सरकारच्या वरिष्ठ अधिका:याने सांगितले की, गृहमंत्रलय तूर्तास नायब राज्यपालांच्या अहवालाची प्रतीक्षा करीत आह़े
4सरकार स्थापनेचा तिढा न सुटल्यास नव्याने निवडणुका घेण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसेल़ नायब राज्यपालांच्या सल्ल्यानुसार आम्ही निर्णय घेऊ आणि तो त्वरित अमलात आणू़
4दिल्लीत नव्याने निवडणुका घेण्याबाबत आग्रही असलेले आम आदमी पार्टीचे सव्रेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आज बुधवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यावर तोफ डागली़ दिल्लीचे नायब राज्यपाल हे भाजपाचे एजंट असल्याचा आणि निवडणुका टाळण्यासाठी भाजपाला मागच्या दाराने मदत करीत असल्याचा खळबळजनक आरोप केजरीवाल यांनी केला़
4दिल्लीतील सत्तेसाठी भाजपा एवढी उतावीळ का? घोडेबाजाराशिवाय भाजपा सरकार कसे स्थापन करणार, असे सवाल काँग्रेस प्रवक्ता शोभा ओझा यांनी उपस्थित केले आहेत़ आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही हेच प्रश्न लावून धरले आहेत़ मात्र भाजपा या सर्वावर चुप्पी साधून आह़े एनकेनप्रकारे दिल्लीत सरकार स्थापनेचे भाजपाचे प्रयत्न आहेत़ या प्रयत्नांना यश न आल्यास शेवटचा पर्याय म्हणून राज्यात नव्याने निवडणुका घेण्यावर भाजपा विचार करणार आह़े