पनीरसेल्वम यांच्याकडे पक्ष धुरा, विलीनीकरणाची आज घोषणा, शशिकला, कुटुंबीयांना बाहेरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 02:45 AM2017-08-21T02:45:34+5:302017-08-21T10:53:22+5:30
अण्णा द्रमुकच्या दोन गटांचे विलीनीकरण करण्यावर अखेर सहमती झाली असून, सोमवारी याची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. या फॉर्म्युल्यानुसार, शशिकला आणि कुटुंबीयांची पक्षातून हकालपट्टी होणार असून, ई. पलानीस्वामी मुख्यमंत्री या नात्याने सरकारची धुरा सांभाळतील, तर ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची जबाबदारी राहणार आहे.
चेन्नई : अण्णा द्रमुकच्या दोन गटांचे विलीनीकरण करण्यावर अखेर सहमती झाली असून, सोमवारी याची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. या फॉर्म्युल्यानुसार, शशिकला आणि कुटुंबीयांची पक्षातून हकालपट्टी होणार असून, ई. पलानीस्वामी मुख्यमंत्री या नात्याने सरकारची धुरा सांभाळतील, तर ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची जबाबदारी राहणार आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि त्यांच्या गटाला दोन-तीन प्रमुख खाती देण्यात येणार आहेत.
ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे सुकाणू समितीचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षांतर्गत अधिकार येतील. या तडजोडीनुसार, पलानीस्वामी यांच्याकडे सरकारची, तर पनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची धुरा असणार आहे.
पनीरसेल्वम यांच्या गटाने असा आग्रह केला आहे की, शशिकला यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावावर सर्व पदाधिकाºयांनी स्वाक्षºया कराव्यात. लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांनी टीटीव्ही दिनकरन यांना उपमहासचिव पदावरून हटविण्याच्या १० आॅगस्ट रोजीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नव्हती. या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार देणारे थंबीदुराई यांच्याकडे प्रचार सचिव आणि पक्षाचे खासदार नवनीत कृष्णन व विजिया सत्यानंद यांच्याकडे अनुक्रमे वकील शाखा व महिला शाखेची जबाबदारी देण्यात येईल.
महासचिवपद मिळण्याची शक्यता
या संदर्भात एक सहा सदस्यीय टीम तयार केल्यानंतर, पनीरसेल्वम यांनी शनिवारीच स्पष्ट केले होते की, आम्ही लवकरच एक चांगली बातमी देणार आहोत. अर्थात, पक्षाचे दोन पानांचे चिन्ह मिळण्यात आता टीटीव्ही दिनकरन हे कायदेशीर अडथळा आणू शकतात. २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपासाठी ही जमेची बाब आहे. कारण अण्णा द्रमुकचे हे दोन गट विलीनीकरणानंतर एनडीएसोबत जाऊ शकतात. तूर्तास मुख्यमंत्रिपद मिळाले नाही, तरी पनीरसेल्वम यांची महासचिवपद मिळण्याची इच्छा आहे.
Amid #AIADMKMerger talks, Guv of Maha & TN C Vidyasagar Rao leaving for Chennai, cancelled all appointments for day in Mumbai, says his PRO pic.twitter.com/4YbKJDPzII
— ANI (@ANI) August 21, 2017