सटाण्यातून पाच लाखाची बॅग लांबविणारा गुमाने जाळ्यात
By admin | Published: November 22, 2015 12:41 AM2015-11-22T00:41:48+5:302015-11-22T00:41:48+5:30
जळगाव: सटाणा येथून अण्णा काशिराम सोनवणे यांची पाच लाख रुपये रोकड असलेली बॅग लांबविणारा मंगल दिवान गुमाने (रा.जाखनी नगर, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. दरम्यान, त्याला लागलीच सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यातील दुसरा आरोपी गोपाल संजू नेतलेकर हा अद्याप फरारच आहे.
Next
ज गाव: सटाणा येथून अण्णा काशिराम सोनवणे यांची पाच लाख रुपये रोकड असलेली बॅग लांबविणारा मंगल दिवान गुमाने (रा.जाखनी नगर, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. दरम्यान, त्याला लागलीच सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यातील दुसरा आरोपी गोपाल संजू नेतलेकर हा अद्याप फरारच आहे.या गुन्ात सहभाग असलेल्या विकास उर्फ हाड्या राजू गुमाने व गोपाल उर्फ सन्नाटा दशरथ माचले (दोन्ही रा.कंजरवाडा, जळगाव) या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेने पकडून त्यांच्याकडून पाच लाख रुपयांपैकी चार लाख ३० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली होती. या आरोपींच्या शोधासाठी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार नारायण सोनवणे, हेडकॉन्स्टेबल बापुराव भोसले, संजय पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील,मिनल साकळीकर आदींच्या पथकाने जळगाव, भुसावळ, नंदुरबार, धुळे व अमळनेर येथे शोध घेतला. यातील मंगल दिवाने हा जाखनी नगरात रात्री घरी येत असल्याची गुप्त माहिती शरद भालेराव व बापुराव भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, या गुन्ात वापरण्यात आलेली दुचाकी याआधीच जप्त करण्यात आली आहे.इन्फोसोरट जुगार चालविणार्या चौघांना अटक सहायक निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार नरुद्दीन शेख, भास्कर पाटील, शशिकांत पाटील, विनयकुमार देसले, मिलिंद सोनवणे, संजय मुरलीधर पाटील व विनोद चौधरी आदींच्या पथकाने साळवा ता.धरणगाव येथे सोरट जुगारावर धाड टाकली. त्यात ईश्वर कौतिक बाविस्कर, दत्तू धोंडू पाटील, कैलास खबालाल जोशी व दीपक भील या चौघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सोरटचे साहित्य व १२४० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौघांवर धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.