POK मधल्या विस्थापितांसाठी दोन हजार कोटींचे पॅकेज ?
By admin | Published: August 29, 2016 02:03 PM2016-08-29T14:03:27+5:302016-08-29T14:03:27+5:30
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून भारतात आश्रयाला आलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने २ हजार कोटीच्या पॅकेजचा प्रस्ताव तयार केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून भारतात आश्रयाला आलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने २ हजार कोटीच्या पॅकेजचा प्रस्ताव तयार केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगी, बाल्टीस्तान या भागातील लोक कित्येक वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये रहात आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालय या पॅकेजची सविस्तर माहिती मंजुरीसाठी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवेल असे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. जम्मू-काश्मीर सरकारने पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात आलेल्या अशा ३६,३४८ कुटुंबांची ओळख पटवली आहे. त्यांना प्रत्येकी ५.५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
जम्मू, कथुआ, राजौरी अशा विविध भागांमध्ये या कुटुंबांचा निवास असून, त्यांना कायमस्वरुपी नागरीकत्व मिळालेले नाही. काही कुटुंबे १९४७ साली फाळणीच्यावेळी तर, काही कुटुंबे १९६५ आणि १९७१ भारत-पाकिस्तान युद्धाच्यावेळी भारतात आली आहेत. हे विस्थापित लोकसभा निवडणुकीत मतदान करु शकतात पण विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही.