Padma Awards 2022: प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण, सायरस पूनावालांना पद्मभूषण पुरस्कार; सुलोचना चव्हाण, सोनू निगम यांचा 'पद्मश्री'नं गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 20:50 IST2022-01-25T20:34:58+5:302022-01-25T20:50:46+5:30
पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १० रत्नाचा सन्मान करण्यात आला आहे. त्यात सर्वोच्च असा पद्मविभूषण पुरस्कार प्रभा अत्रे यांना घोषित करण्यात आला आहे

Padma Awards 2022: प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण, सायरस पूनावालांना पद्मभूषण पुरस्कार; सुलोचना चव्हाण, सोनू निगम यांचा 'पद्मश्री'नं गौरव
नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं पद्म पुरस्कारांच्या नावांची घोषणा केली आहे. यावर्षी पद्मविभूषण पुरस्कारासाठी ४ नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील ३ पुरस्कारकर्त्यांचा मरणोत्तर सन्मान आहे. पद्मविभूषण पूरस्कारांमध्ये दिवंगत माजी सीडीएस जनरल बिपीन रावत, भाजपाचे दिवंगत नेते कल्याण सिंह, राधेश्याम खेमका तर प्रभा अत्रे यांनाही पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे.
पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १० रत्नाचा सन्मान करण्यात आला आहे. त्यात सर्वोच्च असा पद्मविभूषण पुरस्कार प्रभा अत्रे यांना घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर नारायण चंद्रशेखरन, सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातील खालील मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे.
डॉ. हेमंतराव बावस्कर (आरोग्य)
सुलोचना चव्हाण (कला)
डॉ. विजयकुमार डोंगरे (आरोग्य)
सोनू निगम (कला)
अनिल कुमार रघुवंशी (सायन्स आणि इंजिनिअरींग)
डॉ. भीमसेन सिंघल (आरोग्य)
डॉ. बालाजी तांबे (आयुर्वेद)
Microsoft CEO Satya Nadella, Alphabet CEO Sundar Pichai, SII MD Cyrus Poonawalla to be conferred with Padma Bhushan
— ANI (@ANI) January 25, 2022
Olympians Neeraj Chopra, Pramod Bhagat & Vandana Kataria, and singer Sonu Nigam to be awarded Padma Shri pic.twitter.com/J5K9aX9Qxz