शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 09:57 PM2019-01-25T21:57:03+5:302019-01-25T21:58:01+5:30
बाबासाहेब पुरंदरे, डॉ. अशोक कुकडे, अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. राष्ट्रपतींकडून ४ पद्मविभूषण, १४ पद्मभूषण आणि ९४ पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बाबासाहेब पुरंदरे, अनिलकुमार नाईक, लोकगायिका तीजन बाई, इस्माईल ओमर यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दिवंगत अभिनेते कादर खान, अभिनेते मनोज वाजपेयी, अभिनेते दिनीयार कॉन्ट्रॅक्टर अभिनेता प्रभुदेवा, अभिनेते दिग्दर्शक वामन केंद्रे आणि गायक, संगीतकार शंकर महादेवन, डॉ. सुदाम काटे, क्रिकेटपटू गौतम गंभीर, फुटबॉलपटू सुनील छेत्री, तबलावादक शिवमणी, शब्बीर सय्यद, डॉ. रवींद्र कोल्हे, स्मिता कोल्हे यांनायांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी - डॉ. अशोक कुकडे, एस. नंबी नारायण, बच्छेंद्री पाल, कुलदीप नायर
प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न !