शरद पवार यांना पद्मविभूषण

By Admin | Published: January 25, 2017 02:28 PM2017-01-25T14:28:38+5:302017-01-25T18:59:47+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे.

Padma Vibhushan to Sharad Pawar | शरद पवार यांना पद्मविभूषण

शरद पवार यांना पद्मविभूषण

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 -  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना  पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे. शरद पवार यांच्यासोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, पी.ए. संगमा, सुंदरलाल पटवा, के.जे येसुदास, सद्गुरू जग्गी वासुदेव आणि उडिपी रामचंद्र राव यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे.  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म  सन्मानांची घोषणा झाली असून, सात जणांना पद्मविभूषण, सात जणांना पद्मभूषण आणि 75 जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले आहेत. 
त्याबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे आप्पासाहेब धर्माधिकारी आणि गायिका अनुराधा पौंडवाल, गायक कैलास खेर या महाराष्ट्रातील व्यक्तींना पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. 
 फलंदाजी आणि कप्तानी आशा दोन्ही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी करत असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला पद्मश्री सन्मान  जाहीर झाला आहे. विराटप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकरणारी कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्टिकमध्ये  चमकदार कामगिरी करणारी दीपा कर्माकर, हॉकीपटू पी. आर. श्रीजेश, थाळीफेकपटू  विकास गौडा या क्रीडापटूंनाही पद्मश्री जाहीर झाला आहे.  त्याबरोबरच  गायिका अनुराधा पौंडवाल, गायक कैलास खेर,  शेफ संजीव कपूर, समीक्षक भावना सोमय्या यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. 
 शरद पवार यांचा अल्प परिचय 
शरद पवार महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ नाव. राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम नोंदवणाऱ्या शरद पवार यांनी राजकारण, समाजकारण, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. 12 डिसेंबर 1940 रोजी पुण्यातील बारामती येथे जन्मलेल्या  पवार यांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले, त्यांनी केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री तसेच कृषिमंत्री म्हणून काम पाहिले. वयाच्या 24 व्या वर्षी महाराष्ट्रातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष झालेल्या शरद पवार यांच्याकडे यशवंतराव चव्हाणांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिजे जात असे. पुढे त्यांनी दोन वेळा काँग्रेस सोडली. 1999 साली सोनिया गांधींच्या विदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर पवार यांच्या पक्षाने तीन वेळा राज्यातील सत्ता पटकावली. तसेच केंद्रातही मंत्रिपद मिळवले. राजकारणाबरोबरच इतर क्षेत्रांमध्येही शरद पवार यांनी योगदान दिले. एमसीए, बीसीसीआय आणि आयसीसी या क्रिकेट संघटनांचे अध्यक्ष म्हणून पवार यांनी ठसा उमटवला. 
 
पद्म सन्मान जाहीर झालेल्यांची संपूर्ण यादी 
 
पद्मविभूषण 
- के.जे. येसुदास (कला-संगीत)
-सद्गुरू जग्गी वासुदेव (आध्यात्म)
- शरद पवार ( सामाजिक सेवा)
-मुरली मनोहर जोशी (सामाजिक सेवा)
-  स्व. सुंदरलाल पटवा (सामाजिक सेवा) (मरणोपरांत)
- स्व. पी.ए. संगमा (सामाजिक सेवा) (मरणोपरांत)
 
पद्मभूषण
- विश्व मोहन भट्ट (कला-संगीत) 
- प्रा. डॉ. देवी प्रसाद द्विवेदी (साहित्य-शिक्षण) 
- तेहेम्टन उद्वादिया (वैद्यकीय)
- रत्नसुंदर महाराज (आध्यात्म)
- स्वामी निरंजन नंदा सरस्वती (योग)
- राजकुमारी महा चक्री शिरिधोर्न (साहित्य, शिक्षण)
- स्व. चो. रामास्वामी (साहित्य, पत्रकारिता) (मरणोपरांत)
 
पद्मश्री सन्मानप्राप्त व्यक्ती
कला
वासंती बिस्ट, सी. के. नायर, अरुणा मोहंती,  भारती विष्णुवर्धन,  साधू मेहेर, टी. के. मूर्ती, लैशराम वीरेंद्रकुमार सिंग, कृष्ण राम चौधरी, बोआ देवी, तिलक गिताई, प्रा. एक्का एडागिरी राव,  जितेंद्र हरिपाल,  कैलास खेर (महाराष्ट्र), प्रसाला बी. पोन्नाम्मल, सुक्री बोम्मागौडा,  मुकुंद नायक, पुरुषोत्तम उपाध्याय, अनुराधा पौंडवाल (महाराष्ट्र), वेप्पा नबी नील,
सिव्हिल सर्विस 
टी. हनुमान चौधरी, टी.के विश्वनाथ, कन्वाल सिब्बल, 
 
साहित्य शिक्षण 
बिरखा बहादूर लिंबू मुरिंगला, इली अहमद, डॉ. नरेंद्र कोहली,  प्रा. जी व्यंकटसुब्बीयाह,  अख्खितम अच्युतम नाम्बुथिरी,  काशिनाथ पंडित,  चामू कृष्णा शास्त्री,  हरिहर कृपालू त्रिपाठी,  मायकेल डानिनो,  पूनम सुरी, व्ही. जी. पटेल,  व्ही कोटेश्वरम्मा,  बलबीर दत्त,  भावना सोमय्या, विष्णू पांड्या, 
वैद्यकशास्त्र 
डॉ. सुब्रतो दास,  डॉ. भक्ती यादव,  डॉ.  मोहम्मद  अब्दुल वाहीद,  डॉ. मदन माधव गोडबोले, डॉ.  देवेंद्र दयाभाई पटेल,  डॉ.   हरक्रिशन सिंग,  डॉ.  मुकुट मिंझ,   
इतर क्षेत्र 
अरुण कुमार शर्मा (पुरातत्व),  संजीव कपूर (कूक),  मीनाक्षी अम्मा (मार्शल आर्ट), गेणाभाई दुर्गाभाई पटेल (शेती) 
विज्ञान
चंद्रकांत पिठावा,  अजॉय कुमार रॉय, चिंताकिंदी मल्लेशाम, जितेंद्रनाथ गोस्वामी,  
समाजसेवा 
दारिपल्ली रामैयाह,  गितेश भारद्वाज, कारिमूल हाक, बिपिन गणात्रा,  निवेदिता रघुनाथ भिडे,  आप्पासाहेब धर्माधिकारी (महाराष्ट्र), बाबा बलबीर सिंग सीचवाल, 
क्रीडा 
विराट कोहली (क्रिकेट), शेखर नाईक (अंध क्रिकेट) विकास गौडा (थाळीफेक),  दीपा मलिक (दीव्यांग अॅथलिट), मरियप्पा थांगवेल्लू (दिव्यांग अॅथलिट),  दीपा कर्माकर (जिम्नॅस्ट),  पी. आर. श्रीजेश (हॉकी) साक्षी मलिक (कुस्ती), 
 
व्यापार 
मोहन रेड्डी वेंकटरामा बोडानापू 
परदेशी नागरिक 
इम्रात खान (कला), अनंत अग्रवाल (साहित्य),  एच. आर. शाह (साहित्य) 
मरणोपरांत 
सुनिती सोलोमन (वैद्यकशास्त्र) 
 

Web Title: Padma Vibhushan to Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.