महाराष्ट्रातील दहा जणांचा पद्मसन्मान, सीरमच्या पुनावालांचाही बहुमान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 07:12 AM2022-01-26T07:12:19+5:302022-01-26T07:12:26+5:30
देशाच्या सर्वोच्च दुसरा नागरी पुरस्कार असलेल्या पद्मविभूषण पुरस्कारासाठी यावर्षी चार जणांची निवड करण्यात आली. यात किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे
जनरल बिपीन रावत, शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण
टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन, सायरस पुनावाला, सत्या नडेला पद्मभूषण
सुलाेचना चव्हाण, डाॅ. हिम्मतराव बावस्कर, डाॅ. विजयकुमार डाेंगरे पद्मश्रीचे मानकरी
तिघांना मरणोत्तर पद्मविभूषण चार पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये तिघांना हा पुरस्कार मरणोत्तर मिळाला आहे. हेलिकाॅप्टर अपघात मरण पावलेले जनरल रावत यांच्यासह उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग व शिक्षण क्षेत्रात याेगदान दिलेल्या राधेश्याम खेमका यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात हेलिकाॅप्टर अपघातात मरण पावलेले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह महाराष्ट्राच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांना मंगळवारी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. काेराेनाची लस तयार करणारे पुणे येथील सायरस पुनावाला, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, आयटी क्षेत्रात देशाचे नाव कोरणारे सुंदर पिचई, सत्या नडेला व महाराष्ट्राचे नटराजन चंद्रशेखर यांना पद्मभूषण सन्मानित केले जाणार आहे. यात ८ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला तर ६ विदेशी नागरिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
देशाच्या सर्वोच्च दुसरा नागरी पुरस्कार असलेल्या पद्मविभूषण पुरस्कारासाठी यावर्षी चार जणांची निवड करण्यात आली. यात किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ८९ वर्षीय प्रभा अत्रे यांचे शास्त्रीय गायनात याेगदान माेठे असून त्यांना यापूर्वी संगीत नाटक अकादमी, पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ
नेते गुलाम नबी आझाद यांचा प्रमुख समावेश आहे. याशिवाय पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट इंडियाचे सायरस पुनावाला यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. काेराेनाच्या प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात पुनावाला यांची भूमिका माेठी आहे.
७१ जणांना पद्मश्री
यात महाराष्ट्रातील लावणी गायिका सुलोचना चव्हाण, सर्पदंशावर औषध
शाेधून काढणारे डाॅ. हिम्मतराव बावस्कर,
डाॅ. विजयकुमार डोंगरे यांच्यासह भालाफेकमध्ये देशाला ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देणाèया नीरज चाेप्रालाहा पद्मश्री जाहीर झाला आहे. मंगळवारी चार जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण व १०७ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
निवडणुकांचा ठळक प्रभाव
येत्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांचा प्रभाव या यादीवर ठळकपणे दिसत
आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घाेषणा करण्यात आली.
काेराेनाला सामर्थ्याने ताेंड दिले : राष्ट्रपती
नवी दिल्ली : काेराेना महामारी संपूर्ण मानव जातीसाठीसमोर एक आव्हान म्हणून उभी आहे. मात्र, भारताने विषाणूविराेधात अतुलनीय संकल्प दाखविल्याचा मला अभिमान आहे. डाॅक्टर्स-परिचारिकांनी प्राणांची पर्वा न करता दीर्घकाळ सेवा दिल्याचे गाैरवाेद्गार राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी काढले. भारताच्या ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. ते म्हणाले, की देशाच्या मुलींनी सर्व अडथळे पार केले असून आता त्यांना सशस्त्र दलांमध्ये स्थायी नियुक्तीला परवानगी दिली आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी देश आज सज्ज आहे. भारताला प्रगतीपथावर अग्रेसर राहून जागतिक पातळीवर याेग्य स्थान प्राप्त करेल.