विरोध प्रदर्शनानंतरही बॉक्स ऑफिसवर पद्मावत हाऊसफुल्ल, पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 12:05 PM2018-01-26T12:05:50+5:302018-01-26T12:06:18+5:30

अनेक अडचणींवर मात करत अखेर बॉक्स ऑफिसवर झळकलेल्या पद्मावत या चित्रपटानं भरगच्च कमाई केली आहे. 25 जानेवारी रोजी संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

Padmavat Housefuck at the box office despite protests, huge earnings on the very first day | विरोध प्रदर्शनानंतरही बॉक्स ऑफिसवर पद्मावत हाऊसफुल्ल, पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई

विरोध प्रदर्शनानंतरही बॉक्स ऑफिसवर पद्मावत हाऊसफुल्ल, पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई

Next

नवी दिल्ली- अनेक अडचणींवर मात करत अखेर बॉक्स ऑफिसवर झळकलेल्या पद्मावत या चित्रपटानं भरगच्च कमाई केली आहे. 25 जानेवारी रोजी संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील चित्रपटगृहांच्या बाहेर हिंसा आणि विरोध प्रदर्शनाचे प्रकार समोर आले आहेत. परंतु या चित्रपटानं आतापर्यंत 20 कोटींची कमाई केली आहे.

एवढं होऊनही देशभरातील चित्रपटगृहांमध्ये पद्मावतसाठी 50 ते 60 टक्के तिकिटांचं बुकिंग झालं आहे. रिपोर्टनुसार, काही शहरांमध्ये भीतीपायी चित्रपट प्रदर्शित झाला नाही, परंतु ज्या शहरांत पद्मावत प्रदर्शित झाला तिथे हाऊसफुल्ल झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 20 कोटींची कमाई केली आहे. एवढं नव्हे, तर ऑस्ट्रेलियातही पद्मावत चित्रपटाला ग्रँड ओपनिंग मिळाली आहे.  

उग्र व हिंसक निदर्शनांना तोंड द्यावे लागलेला ‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी अतिशय कडक पोलीस बंदोबस्तात प्रदर्शित झाला होता. काही ठिकाणी राखीव दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते. गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या भाजपाशासित राज्यांत तो प्रदर्शित झाला नाही, तर उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, तामिळनाडूमध्ये तो काही ठिकाणीच झळकला. मात्र महाराष्ट्रासह बंगाल, आंध्र प्रदेश आदी नऊ महत्त्वाच्या राज्यांतील चित्रपटगृहांत तो विनाविघ्न प्रदर्शित झाला. हा चित्रपट पहिल्या दिवशी चार हजार चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आणि 10 लाख लोकांनी पाहिला, असा दावा निर्मात्यांनी केला आहे. या चित्रपटाविरोधात करणी सेनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला गुजरातमध्ये फारसा प्रतिसाद लाभला नाही. गुजरातमधील काही मार्गांवर बससेवा बंद ठेवण्यात आली होती.

न्यायालयाचा अवमान-
पद्मावतच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असतानाही गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा, राजस्थान या राज्यांनी घेतलेली भूमिका आणि करणी सेनेचे आंदोलन यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे, अशा याचिका तहसीन पुनावाला व अ‍ॅड. विनीत धांडा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. त्यावर 29 जानेवारीला सुनावणी आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा व मध्य प्रदेशात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली. हा चित्रपट पाहू नये, असे आवाहन रा. स्व. संघाच्या वायव्य विभागाचे प्रमुख भगवती प्रकाश यांनी केले. त्यामुळे या आंदोलनामागे भाजपा व संघ असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

Web Title: Padmavat Housefuck at the box office despite protests, huge earnings on the very first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.