पद्मावती चित्रपटाच्या वादातून हत्या ?, दगडावर लिहिला होता इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 04:42 AM2017-11-25T04:42:10+5:302017-11-25T04:43:23+5:30

जयपूर : येथील नाहरगढ किल्ल्याबाहेर एका तटबंदीच्या भिंतीवर लटकवलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली

Padmavati was shot on the promise of the film? It was written on the stone | पद्मावती चित्रपटाच्या वादातून हत्या ?, दगडावर लिहिला होता इशारा

पद्मावती चित्रपटाच्या वादातून हत्या ?, दगडावर लिहिला होता इशारा

Next

जयपूर : येथील नाहरगढ किल्ल्याबाहेर एका तटबंदीच्या भिंतीवर लटकवलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून, त्याच ठिकाणी असलेल्या दगडांवर लिहिलेल्या इशारासूचक संदेशावरून हा प्रकार ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या वादाशी संबंधित असल्याचे स्पष्ट होते.
मृत व्यक्तीची ओळख पटली असून, चेतन कुमार सैनी (४०) असे त्याचे नाव आहे. तो तेथील रहिवासी आहे. नाहरगढ किल्ल्याच्या एका तटबंदीच्या भिंतीवर त्याचा मृतदेह लटकावलेल्या स्थितीत आढळला. जवळच्या दगडावर एक संदेशही लिहिलेला आढळला आहे; परंतु या घटनेचा संबंध ‘पद्मावती’ चित्रपटाला होत असलेल्या विरोधाशी जोडणे घाईचे ठरेल, असे पोलीस उपायुक्त सत्येंद्र सिंह यांनी सांगितले.
‘पद्मावती का विरोध करनेवालो, हम पुतले जलाते नही, लटकाते है... हम में हैं दम’ असा संदेश मृतदेह आढळून आलेल्या ठिकाणावरील एका दगडावर लिहिलेला आढळला. चेतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. चेतन कुमार सैनी याने आत्महत्या केल्याची शक्यता नाही. त्याला ठार करण्यात आले आहे, असे त्याच्या भावाने सांगितले.
निषेध वा विरोधाचा हा मार्ग नव्हे, असे राजपूत समुदायाचे प्रतिनिधित्व करणाºया राजपूत करनी संघटनेने म्हटले आहे. राजपूत करनी सेनेचे अध्यक्ष महीपाल सिंह मकराणा यांनी म्हटले आहे की, संघटनेला चिथावण्याच्या उद्देशाने घटनास्थळावरील दगडांवर चिथावणीकारक संदेश लिहिण्यात आलेला आहे. जे काही घडले, ते अत्यंत चुकीचे आहे.
आंदोलकांनी दोन दिवसांपूर्वी चित्तोडगढ किल्ला पर्यटकांसाठी बंद करून भन्साळी यांच्या प्रतिमांचे दहन केले होते. दुसºया दिवशी राजपूत समुदायाने कुंभलगड किल्लाही पर्यटकांसाठी बंद केला होता. (वृत्तसंस्था)
>दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
दिल्ली उच्च न्यायालयाने ‘पद्मावती’ चित्रपटाविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली. अशा याचिकांमुळे चित्रपटाला विरोध करणाºया लोकांना उत्तेजन मिळते. याचिका निराशेतून आणि चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आली, असे स्पष्ट करून प्रभारी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल आणि न्या. सी. हरी शंकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.
>जम्मूमध्ये निदर्शने
दरम्यान, पद्मावती या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी जम्मू शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. भन्साळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही निदर्शकांनी या वेळी केली.

Web Title: Padmavati was shot on the promise of the film? It was written on the stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.