पान १ - सुधारित -उद्धव ठाकरे

By admin | Published: September 27, 2014 11:18 PM2014-09-27T23:18:17+5:302014-09-27T23:18:17+5:30

भाजपाने मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला!

Page 1 - Improved- Uddhav Thackeray | पान १ - सुधारित -उद्धव ठाकरे

पान १ - सुधारित -उद्धव ठाकरे

Next
जपाने मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला!
-उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप: लाट कशाला म्हणतात ते दाखवून देऊ
मुंबई- आपल्या हटवादीपणामुळे युती तुटली नाही. हवे तर त्याचे पुरावे देण्यास आपण तयार आहोत. भाजपाने युती तोडायचीच हे ठरवले होते. बाहेरची माणसे बरोबर घेऊन गेली २५ वर्षे सोबत केलेल्या मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम भाजपाने केले, असा सनसनाटी आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला.
तुम्ही मांजर समजून ज्याच्या गळ्यात घंटा बांधत आहात ते मांजर नसून वाघ आहे हे विसरू नका. आमचा समुद्र आता शांत असला तरी लाट कशाला म्हणतात ते हा शिवसैनिक दाखवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ महालक्ष्मी रेसकोर्सवरील सभेत झाला. उद्धव म्हणाले की, शिवसेनेने आपल्या वाट्याच्या १८ जागा मित्र पक्षांना देऊ केल्या. भाजपाने मित्रपक्षांना जागा दिल्यावर त्यांच्या कमी होणार्‍या जागा भरून दिल्या. तरीही तीन जागांची मागणी केली गेली. त्यापैकी दोन जागा देण्याची तयारी दाखवली. मात्र शिवसेनेच्या जागा कमी करायच्या, निवडून येणार्‍या जादा काढून घ्यायच्या आणि निवडणुकीपूर्वी शिवसेनेला पराभूत करायचे अशी ही रणनिती होती. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाकरिता युती तोडली असा आरोप ते करतात. त्यांना तसे वाटत असेल तर हो मुख्यमंत्रीपदाकरिता मी युती तोडली. परंतु तुम्हालाही मुख्यमंत्रीपदच हवे होते ना की, तुम्ही मंत्रालयात जाऊन सागरगोटे की लगोरी खेळणार होता, असा सवाल ठाकरे यांनी भाजपाला केला.
ठाकरे म्हणाले की, युती तोडण्याबाबतचा फोन एकनाथ खडसे यांनी केला. तेव्हा ते मला म्हणाले की, मांजराच्या गळ्यात कुणीतरी घंटा बांधली पाहिजे. तुम्ही मांजर समजून ज्याच्या गळ्यात घंटा बांधत आहात ते मांजर नसून वाघ आहे हे विसरू नका. आमचा समुद्र आता शांत असला तरी लाट कशाला म्हणतात ते हा शिवसैनिक दाखवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीतील मोदींची ती लाट वेगळी होती. तो इतिहास होता आता पाय जमिनीवर ठेवा, असेही ते म्हणाले.
..........................................................
पंकजा, प्रितमच्या विरोधात उमेदवार नाही
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या दोन भाजपा नेत्यांशी आपले कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे शिवसेना २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी पंकजा मुंडे यांना विधानसभा मतदारसंघ तर प्रितम मुंडे लढवत असलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
..........................................................
माणिक मुंडेंनी भाजपाची उमेदवारी फेटाळली
भाजपाने जाहीर केलेल्या यादीत निवृत्त सनदी अधिकारी माणिक मुंडे यांना जिंतूरमधून उमेदवारी देऊ केली होती. मात्र मुंडे हे शिवसेनेच्या व्यासपीठावर हजर होते. भाजपाने उमेदवारी देऊनही शिवसेनेची साथ सोडणार नसल्याचा निर्णय मुंडे यांनी घेतल्याबद्दल उद्धव यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Page 1 - Improved- Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.