पान १ संथारा जोड- जैन धर्म...
By Admin | Published: August 10, 2015 11:28 PM2015-08-10T23:28:24+5:302015-08-10T23:28:24+5:30
>सर्वोच्च न्यायालयात दाद मागावीराजस्थान हायकोर्टाने दिलेला निर्णय जैन धर्मीयांविरुद्ध असून या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी. संथारातून होणारा मृत्यू नैसर्गिक असतो. संसारात असलेली व्यक्ती आत्म्याचा त्याग करतो. त्यामुळे आत्म्याचे कल्याण होते. मोक्ष प्राप्त होतो आणि पुढील जन्म समाजाच्या उद्धारासाठी मिळतो. संसारात असलेली व्यक्तीच अन्न आणि पाण्याचा त्याग करते. अशांची शवयात्रा गुरू परंपरेनुसार आनंदात आणि गुलाल उधळून नेली जाते. संथाराची नोंद जैन शास्त्रांमध्ये आहे. म्हणूनच संथारा ही आत्महत्या आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. निखिल कुसुमगर, सचिव, सकल जैन समाज