पान 2-
By Admin | Published: December 2, 2015 02:20 AM2015-12-02T02:20:42+5:302015-12-02T02:20:42+5:30
डिचोलीत 13 रोजी कथाकथन स्पर्धा
ड चोलीत 13 रोजी कथाकथन स्पर्धा डिचोली : गोवा प्रदेश सानेगुरूजी कथामाला आणि कला व संस्कृती संचालनालय पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने 38 वी विद्यार्थी कथाकथन स्पर्धा 2015 केंद्र पातळीवरील डिचोली केंद्रासाठी रविवार दि. 13 रोजी केंद्रशाळा डिचोली येथे घेण्यात येणार आहे. सकाळी 9 ते 4 या वेळेत होणार्या या स्पर्धेत प्राथमिक गट पहिली ते चौथी (परिकथा), उच्च प्राथमिक गट पाचवी ते सातवी वीर बालक-बालिका शौर्यकथा, माध्यमिक गट आठवी ते दहावी मूल्यकथा (र्शम प्रतिष्ठा, सर्वधर्मसमभाव, वक्तशीरपणा, त्याग या मूल्यांवर आधारीत कथा) स्पर्धा घेण्यात येईल. प्राथमिक गटातील विजेत्यांना प्रथम 200 रुपये, द्वितीय 175 रुपये, तृतीय 160 रुपये. उच्च प्राथमिक गट प्रथम 225 रुपये, द्वितीय 200 रुपये व तृतीय 175 रुपये. माध्यमिक गट प्रथम 275 रुपये, द्वितीय 225 रुपये, तृतीय 200 रुपये. दरवर्षाप्रमाणे हुतात्मा रामचंद्र नेवगी व कै. गोमतीबाई रा. नेवगी यांच्या स्मरणार्थ अरविंद रा. नेवगी (डिचोली) यांच्याकडून राज्य स्पर्धांतील तिन्ही गटातील प्रथम क्रमांक 500 रुपये, द्वितीय 400 रुपये, तृतीय 300 रुपये, चौथा 200 रुपये व पाचवा 100 रुपये देण्यात येतील. कै. वैशाली अ. नेवगी स्मरणार्थ अरविंद रा. नेवगी कडून राज्य स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना साधनाचा बालकुमार दिवाळी अंक देण्यात येईल. डिचोली केंद्रशाळेत होणार्या स्पर्धेवेळी नास्ता व भोजनची सोय आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक स्मृतिचिन्ह देण्यात येणार असल्याची माहिती डिचोली केंद्र प्रमुख र्शीकृष्ण धोंड यांनी दिली. (लो. प्र.)