पान 2 : ‘मोपा’चे प्रत्यक्ष काम येत्या वर्षी मे-जूनमध्ये सुरू होणार मुख्यमंत्री : 2019 पर्यंत पहिला टप्पा कार्यान्वित होणार

By Admin | Published: July 31, 2015 12:22 AM2015-07-31T00:22:52+5:302015-07-31T00:22:52+5:30

पणजी : ‘मोपा’चे प्रत्यक्ष काम येत्या वर्षी मे ते जूनमध्ये सुरू होईल आणि 2019 पर्यंत या नियोजित विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन तो कार्यान्वितही होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी विधानसभेत केले.

Page 2: The actual work of MOPA will start in May-June next year: the first phase will be operational till 2019 | पान 2 : ‘मोपा’चे प्रत्यक्ष काम येत्या वर्षी मे-जूनमध्ये सुरू होणार मुख्यमंत्री : 2019 पर्यंत पहिला टप्पा कार्यान्वित होणार

पान 2 : ‘मोपा’चे प्रत्यक्ष काम येत्या वर्षी मे-जूनमध्ये सुरू होणार मुख्यमंत्री : 2019 पर्यंत पहिला टप्पा कार्यान्वित होणार

googlenewsNext
जी : ‘मोपा’चे प्रत्यक्ष काम येत्या वर्षी मे ते जूनमध्ये सुरू होईल आणि 2019 पर्यंत या नियोजित विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन तो कार्यान्वितही होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी विधानसभेत केले.
विमानतळ खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तरादाखल ते बोलत होते. या मागण्या आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या कामाचे वेळापत्रकच जाहीर केले. आरएफक्यू मागविले असता पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून या प्रस्तावाचे मूल्यमापन सध्या चालू आहे. येत्या महिन्यात कंपनीची निवड होईल, तसेच डिसेंबरपर्यंत विकासक निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले.
‘मोपा’साठी तांत्रिकी अहवाल तयार करणारी लुईस बर्जर कंपनी सध्या भ्रष्टाचारप्रकरणी वादात सापडल्याने विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकल्पासाठी केवळ लुईस बर्जरनेच नव्हे, तर अमन अँण्ड व्हाइट नीक या कंपनीसह एकूण चार कंपन्यांच्या कन्सोर्टियमने तांत्रिकी अहवाल तयार केलेला आहे. केवळ एका कंपनीने हे काम केलेले नाही. काम आता बरेच पुढे गेले आहे. कन्सल्टंटचे काम संपलेले आहे. त्यामुळे प्रकल्प रोखण्याचा प्रश्नच नाही.
‘मोपा’च्या बाबतीत सल्लागार कंपनीच्या संबंधी काही गैरव्यवहार झाला असेल तर तो शोधून काढू. या प्रकरणात सरकार राजकीय हस्तक्षेप मुळीच करणार नाही.
‘चिपी’ विमानतळाचा फेरआढावा
शेजारी सिंधुदुर्गात चिपी विमानतळाचे काम सुरू असल्याने व्यक्त केली जाणारी भीती निर्थक असल्याचा दावा पार्सेकर यांनी केला. चिपीबाबत ग्रीनफील्ड एअरपोर्ट अँथॉरिटी ऑफ इंडियाने एमआयडीसीला दोन महिन्यांत सुधारित मास्टर प्लॅन तयार करायला सांगितले आहे. तेथे येणारा विमानतळ हा कमी लांबीच्या धावप?ीचा आणि छोट्या विमानांचा असेल त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. उलट ‘चिपी’बाबतीत एमआयडीसीलाच साशंकता असल्याने आता धावप?ी कमी करण्याचे प्रयत्न तेथे चालले आहेत. गोव्याचे पर्यटक कोठेही वळणार नाहीत याची काळजी घेऊ, असे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी अनुदान मागण्याच्या चर्चेच्यावेळी विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी ‘मोपा’च्या कामाला चालना देण्याची मागणी केली. शेजारी सिंधुदुर्गात चिपी येथे विमानतळाचे काम जोरात सुरू आहे. तेथील किनारेही स्वच्छ आणि चांगले आहेत. त्यामुळे पर्यटक एकदा तेथे वळल्यास गोव्याच्या पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा राणे यांनी दिला.
दुसरीकडे काँग्रेसचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मोपा रद्दच करावा, अशी मागणी केली. या विमानतळासाठी ज्या कंपनीने तांत्रिकी अहवाल तयार केलेला आहे, ती कंपनीच भ्रष्टाचाराच्या प्रकरणात वादग्रस्त बनलेली आहे. त्यामुळे कसा विश्वास ठेवा, असा प्रश्न त्यांनी केला.
मोपाची पायाभरणी चालू वर्षातच करा, अशी मागणी आमदार प्रमोद सावंत यांनी केली. या नियोजित विमानतळासाठी लागणारे 10 हजार जणांचे मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रशिक्षणही सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार कालरुस आल्मेदा यांनी दाबोळीच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन घिसाडघाईने करण्यात आल्याचा आरोप करून त्यामुळेच काही दिवसांपूर्वी छत कोसळल्याचे नमूद केले.
आमदार किरण कांदोळकर यांनी ‘मोपा’ची अत्यंत गरज असल्याचे नमूद केले. त्यामुळे रोजगारालाही मोठा वाव मिळेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Page 2: The actual work of MOPA will start in May-June next year: the first phase will be operational till 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.