पान 2- सरकारने कॅसिनो स्थलांतराचा निर्णय बदलावा

By admin | Published: August 16, 2015 11:44 PM2015-08-16T23:44:31+5:302015-08-16T23:44:31+5:30

पेडणे : सरकारने स्वत:चा निर्णय जनतेवर जबरदस्तीने लादून मांडवीतील कॅसिनो शापोरा नदीत आणण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरून जाब विचारावा लागेला, असा इशारा पेडणे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सरपंच देवेंद्र प्रभूदेसाई यांनी मोरजी येथे कॅसनोविरोधी सभेत बोलताना दिला.

Page 2- Change the decision of the government moving the casino | पान 2- सरकारने कॅसिनो स्थलांतराचा निर्णय बदलावा

पान 2- सरकारने कॅसिनो स्थलांतराचा निर्णय बदलावा

Next
डणे : सरकारने स्वत:चा निर्णय जनतेवर जबरदस्तीने लादून मांडवीतील कॅसिनो शापोरा नदीत आणण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरून जाब विचारावा लागेला, असा इशारा पेडणे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सरपंच देवेंद्र प्रभूदेसाई यांनी मोरजी येथे कॅसनोविरोधी सभेत बोलताना दिला.
मोरजीचो एकवट संघटनेने पेडणे तालुक्यातील सामाजिक संघटना व जागरुक नागरिकांना एकत्रित आणून कॅसिनोंच्या विरोधात 16 रोजी रावराजे सभागृह, मोरजी येते सभा झाली. त्यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष बाबी बागकर, निमंत्रक नारायण रेडकर, मोरजीचो एखवट संघेनेचे अध्यक्ष वसंत शेटगावकर, सुधीर कान्नाईक, दादी शेटगावकर, रॉशल फर्नांडिस, आगरवाडा माजी सरपंच अमोल राऊत, पार्से माजी सरपंच गुरूदास पांडे, राष्ट्रवादी गट अध्यक्ष रोहिदास आरोलकर, मच्छीमार व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष भीम पेडणेकर आदी हजर होते.
मांडवी नदीतील कॅसिनो इतरत्र हलवण्यासाठी तीन ठिकाणांची सरकारे निवड करून जनतेकडून लेखी प्रश्न, हरकती मागितल्या आहेत. त्यात शारोपा नदीचा उल्लेख झआल्यो स्थानिक व मच्छीमार व्यावसायिकांनी शापोरा नदीत कॅसिनो आणण्यास यावेळी तीव्र हरकती घेतल्या.
यावेळी देवेंद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले, की सरकारे पेडण्यातील जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. गोव्याला नको असलेले प्रकल्प पेडण्यात आणू पाहणार्‍यांच्या या भूमीतल्या मुख्यमंत्र्यांनी पेडणे तालुका डंपींग मैदान समजू नये. बेरोजगारी हटवणारे प्रकल्प आणावेत. कॅसिनोसारख्या महाजुगाराला निमंत्रण देऊ नये. कॅसिनोमुळे मांडवी नदी प्रदूषित झाली आहे आणि तेच कॅसिनो ..............
गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष बाबी बागकर यांनी सरकारवर टीका करताना पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या या किनारी भागात सरकारचे नियोजन नाही. मात्र आपली संस्कृती नष्ट करण्यासाठी शापोरा नदीत कॅसिनो आणू पाहणार्‍यांचा डाव हाणून पाडला पाहिजे. कचर्‍यासारखा गंभीर प्रस्न सरकारला सोडवता आला नाही. रात्रभर संगीत रजनी ठराविक रेस्टॉरण्टमध्ये वाजवायला मुभा देणार्‍या सरकारला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे बागकर म्हणाले.
मच्छीमार व्यावसायिक संघटनेचे भीम पेडणेकर यांनी शापोरा नदीत कॅसिनोला थारा दिला जाणार नाही. वेळप्रसंगी पेडणे व बार्देश तालुक्यातील मच्छीमार व्यावसायिक प्राणपणाने विरोध करतील असे सांगितले.
नारायण रेडकर यांनी कॅसिनो संस्कृतीमुळे तरुण पिढी व्यासनाधीन होणार असल्याने कॅसिनोला विरोध आहे, असे सांगितले.
मोरजीचो एकवट संघटनेचे अध्यक्ष वसंत शेटगावकर यांनी कॅसिनोंमुळे शापोरा नदी प्रदूषित होऊन छोट्या मोठय़ा मच्छीमार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल असे सांगितले.
यावेळी गुरूदास पांडे, अमोल राऊत, आल्बर्ट फर्नांडिस, रॉशल फर्नांडिस, गिल्बर्ट डिसोझा, प्रदीप कोले, सुधीर कान्नाईक आदींची कॅसिनोला विरोध करणारी भाषणे झाली.
यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक हजर होते. दादी ऊर्फ लक्ष्मण शेटगावकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
फोटो ओळी-
मोरजी येथे कॅसिनोच्या विरोधात बोलताना पेडणे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र प्रभूदेसाई. सोबत मोरजीचो एकवट संघटेनेचे अध्यक्ष वसंत शेटगावकर, गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाबी बागकर व इतर. (छाया : निवृत्ती शिरोडकर)

Web Title: Page 2- Change the decision of the government moving the casino

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.