पान २ : जमीन बळकाव कारस्थान हाणून पाडा : होबळे
By admin | Published: May 5, 2015 01:20 AM2015-05-05T01:20:52+5:302015-05-05T01:20:52+5:30
सावर्डे : गोव्यात हजारो कुटुंबांकडे ते कसत असलेल्या जमिनीची कागदपत्रे नाहीत. मात्र, त्यांना त्या जमिनी पूर्वजांपासून त्यांच्या जवळ आल्या आहेत. अशा कोणतीच कागदपत्रे नसलेल्या जमिनीतून पद्धतशीरपणे बाहेर काढून मागीलदाराने भाटकारांना हक्क देण्याचे कटकारस्थान सध्या सरकारने रचलेले आहे. त्याचा बिमोड करून आपल्या जमिनीचे हक्क शाबूत ठेवण्यासाठी राज्यातील सर्व बहुजन समाजातील घटकांनी एकत्र येऊन प्रतिकार करण्याची गरज आहे, असे विचार गोमंतक बहुजन महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे यांनी किर्लपाल येथे बोलताना व्यक्त केले.
Next
स वर्डे : गोव्यात हजारो कुटुंबांकडे ते कसत असलेल्या जमिनीची कागदपत्रे नाहीत. मात्र, त्यांना त्या जमिनी पूर्वजांपासून त्यांच्या जवळ आल्या आहेत. अशा कोणतीच कागदपत्रे नसलेल्या जमिनीतून पद्धतशीरपणे बाहेर काढून मागीलदाराने भाटकारांना हक्क देण्याचे कटकारस्थान सध्या सरकारने रचलेले आहे. त्याचा बिमोड करून आपल्या जमिनीचे हक्क शाबूत ठेवण्यासाठी राज्यातील सर्व बहुजन समाजातील घटकांनी एकत्र येऊन प्रतिकार करण्याची गरज आहे, असे विचार गोमंतक बहुजन महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे यांनी किर्लपाल येथे बोलताना व्यक्त केले. धारबांदोडा तालुक्यात जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या किर्लपालच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश वेळीप, सरचिटणीस डॉ. उदय गावकर, सचिव उपेंद्र गावकर, किर्लपालचे सरपंच कालिदास गावकर, पंच हनुमंत गावकर, संयुक्त खजिनदार रवींद्र माडकर, भंडारी समाजाचे केंद्रीय समितीचे सदस्य आनंद मंगेश नायक, वामन खांडेपारकर, बालसती देवस्थानचे अध्यक्ष शशिकांत गावकर, गणेश गावकर उपस्थित होते. बहुजन समाजावर सध्या अन्याय होत असून त्यावर जाब विचारण्यासाठी प्रत्येक घटकाची पाठराखण करण्यासाठी अशा महासंघाची गरज होती. ती आता पूर्ण झालेली असली तरी आम्हाला आमची शक्ती दाखवून द्यायला हवी, असेही ते म्हणाले. बादीक समाजाला विविध प्रकारे सुधाण्यासाठी सदानंद स्वामी, ब्राानंद स्वामी व ब्रोशानंद स्वामी यांचे मोलाचे योगदान असून बहुजन महासंघालाही त्यांचे आशीर्वाद मिळावे या हेतूने महासंघाच्या उद्घाटन समारंभाला ब्रोशानंद स्वामी यांना आमंत्रित केल्याचे होबळे म्हणाले. सध्या गोव्यात डिव्हाईड ॲण्ड रुल असे ब्रिटीश व पोर्तुगिजांचाच कित्ता गिरवण्यात येत असून त्यात बहुजन समाज भरडत चालला असल्याचे कार्याध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सांगितले. आनंद वळवईकर यांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी बहुजन समाजाची संघटित शक्ती दाखविणे योग्य ठरणार, असे सांगितले. या वेळी वामन खांडेपारकर यांनी वन खात्याकडून होणार्या सतावणुकीची माहिती देवून हा प्रश्नही महासंघामार्फत सोडविण्याची मागणी केली. सरपंच कालिदास गावकर यांनी किर्लपालचे महासंघाला पूर्ण सहकार्य असेल, असे सांगितले. सचिव उपेंद्र गावकर यांनी गोमंतक बहुजन महासंघ स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. सुरुवातीस शशिकांत गावकर यांनी स्वागत केले. डॉ. उदय गावकर यांनी सूत्रसंचालन केले. पंच हनुमंत गावकर यांनी आभार मानले. (लो.प्र.)फोटो : गोमंतक बहुजन महासंघाच्या किर्लपाल येथील जागृती बैठकीत बोलताना महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे. बाजूला प्रकाश वेळीप, उपेंद्र गावकर, वामन खांडेपारकर, पंच हनुमंत गावकर, डॉ. उदय गावकर व इतर. (छाया : आनंद मंगेश नायक)