पान २ : त्या पाच महिलांना मार्के ट शेडमध्ये जागा

By admin | Published: May 5, 2015 01:20 AM2015-05-05T01:20:59+5:302015-05-05T01:20:59+5:30

फोंडा : येथील मार्केटमधील प्रवेशद्वारावर बसत असलेल्या काही विके्रत्यांवर पालिका आणि पोलिसांनी कारवाई केली. फुटपाथजवळील खासगी जागेवर बसलेल्या काही मोजक्याच विक्रेत्यांनी केलेल्या मागणीची दखल घेण्यात आली; परंतु मार्केटातील विके्रत्यांच्या मागण्यांकडे अजूनही लक्ष न दिल्याने बाजारात सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

Page 2: The five women have their place in the Mark Sheet | पान २ : त्या पाच महिलांना मार्के ट शेडमध्ये जागा

पान २ : त्या पाच महिलांना मार्के ट शेडमध्ये जागा

Next
ंडा : येथील मार्केटमधील प्रवेशद्वारावर बसत असलेल्या काही विके्रत्यांवर पालिका आणि पोलिसांनी कारवाई केली. फुटपाथजवळील खासगी जागेवर बसलेल्या काही मोजक्याच विक्रेत्यांनी केलेल्या मागणीची दखल घेण्यात आली; परंतु मार्केटातील विके्रत्यांच्या मागण्यांकडे अजूनही लक्ष न दिल्याने बाजारात सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
शुक्रवारी त्या विक्रेत्यांनी मार्केटातील प्रवेशद्वारावर बसत असलेल्या महिलांना हटविले तरच आपण आत मार्केटमध्ये बसतो, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीप्रमाणे मार्केटातील प्रवेशव्दारावर बसत असलेल्या विक्रेत्यांना पालिक ा आणि पोलिसांनी कारवाई करून हटविण्यात आले. पालिकेनेे त्या पाच विक्रेत्यांच्या मागणीनुसार त्यांना आत मार्केटमध्ये शेड असलेल्या ठिकाणी जागा देण्यात आली. यातील दोन महिला आत बसण्यासाठी तयार झाल्या, तर इतर महिलांनी बसण्यास विरोध केला. याविषयी पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी माहिती दिली की, शुक्रवारी त्या विक्रेत्या फुटपाथ सोडून आत बसायला तयार झाल्या होत्या. प्रवेशद्वारातील १० महिलांना पालिकेने हटविले आहे. त्यानंतर त्या विक्रेत्यांनी पुन्हा मागणी केली की, राहिलेल्या महिलांनाही प्रवेशद्वारातून हटवावे अन्यथा आपण आत बसणार नाही. तेव्हा मात्र आपण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. (प्रतिनिधी)

Web Title: Page 2: The five women have their place in the Mark Sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.