पान २ : गोव्यासाठीच गोव्यात येतो : पर्रीकर

By admin | Published: April 11, 2015 01:40 AM2015-04-11T01:40:30+5:302015-04-11T01:40:30+5:30

गोव्यासाठीच गोव्यात येतो : पर्रीकर

Page 2: Goa comes only for Goa: Parrikar | पान २ : गोव्यासाठीच गोव्यात येतो : पर्रीकर

पान २ : गोव्यासाठीच गोव्यात येतो : पर्रीकर

Next
व्यासाठीच गोव्यात येतो : पर्रीकर

बार्देस : संरक्षणमंत्री असतानाही गोव्याच्या हितासाठी आपण महिन्यातून दोन ते तीनवेळा येथे येतो. गोव्याचा सर्वांगीण विकास व्हावा, हे आपले स्वप्न आहे. माझे येणे अनेकांच्या डोळ्यात खुपते हे खरे असले तरी टीकेला घाबरून गोव्यात येण्याचे बंद करणार नाही, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
हडफडे-कळंगुट मार्गावर सुमारे साडेचार कोटी खर्चून उभारलेल्या पुलाच्या शुभारंभावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंते बोरकर, फादर सिप्रियानो डिसिल्वा, जिल्हा पंचायत सदस्य शॉन मार्टीन, नागवा-हडफडेच्या सरपंच सुषमा नागवेकर इत्यादी उपस्थित होते.
पर्रीकर पुढे म्हणाले की, गोव्यात मागील सरकारने कामाचे नियोजन कधीच केले नाही. मग विकास कसला करणार, असे ते म्हणाले.
गोव्याच्या विकासात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. आपले घर बांधताना रस्ता रुंदीकरणासाठी आधीच जागा सोडावी, तसेच वाहन पार्किंगसाठी आपल्या इमारतीच्या प्रांगणातच व्यवस्था करावी, असे आवाहन मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केले.
मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, सरकारने हाती घेतलेली सर्व कामे पुढील अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने १८५० कोटी रुपये रस्त्याच्या बांधकामासाठी दिलेले आहेत. येत्या सहा महिन्यांत चौपदरी रस्त्याचे बांधकाम सुरू होणार आहे.
...................
पाणी दरवाढीला मागील
सरकार जबाबदार : ढवळीकर
गोव्यात पिण्याच्या पाण्याचे दर वाढल्याचे विरोधक ठासून सांगतात; परंतु जायका कंपनीशी करार त्यांनीच करून या वाढीव दराचा त्यात अंतर्भाव केलेला आहे. यास मागील सरकार जबाबदार असल्याचेही ढवळीकर यांनी या वेळी सांगितले.
....................
या सोहळ्यात ताकिया काकुलो, डेन कुएलो, गोविंद कळंगुटकर, किशा लोबो, अमिता मिनेझिस यांचा शाल, श्रीफळ, समई प्रदान करून सत्कार करण्यात आला. जिल्हा पंचायत सदस्य शॉन मार्टीन, कंत्राटदार दुराई पंडियन यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. या वेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य ॲन्थोनी मिनेझिस, कळंगुट भाजप गटाध्यक्ष गुरुदास शिरोडकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता दत्तप्रसाद सिनाई बोरकर, फादर सिप्रियानो डिसिल्वा, आमदार मायकल लोबो यांचीही समयोचित भाषणे झाली. सूत्रसंचालन सुदेश शिरोडकर यांनी केले. आभार सुषमा नागवेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)
फोटो : १००४-एमएपी-०५
नागवा-हडफडे पुलाच्या नामफलकाचे अनावरण करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर. सोबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार मायकल लोबो, डॉ. प्रमोद सावंत व इतर. (प्रकाश धुमाळ)

Web Title: Page 2: Goa comes only for Goa: Parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.