पान 2 : नायजेरियन नागरिकांना आठ दिवसांत हाकला
By admin | Published: September 6, 2015 11:54 PM2015-09-06T23:54:57+5:302015-09-06T23:54:57+5:30
पालये ग्रामसभेत मागणी : घरमालकांना भेटण्याचा निर्णय, युवकांचा आंदोलनाचा इशारा
Next
प लये ग्रामसभेत मागणी : घरमालकांना भेटण्याचा निर्णय, युवकांचा आंदोलनाचा इशारामांद्रे : पालये (पेडणे) पंचायतीच्या रविवारी झालेल्या खास ग्रामसभेत ग्रामस्थांनी नायजेरियन युवकांपासून उपद्रव होत असल्याबद्दलचा जाब पंचायतीला विचारला. नायजेरियनांच्या येथील वास्तव्यावर कोणताच परिणाम होत नसल्याने व पंचायतीने केलेल्या पत्रव्यवहाराला यश येत नसल्याने येथील युवकांनी संताप व्यक्त केला. नायजेरियनांपासून गावाला धोका असल्याने आठ दिवसांच्या आत घरे खाली करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पेडणे व्हिलेजीस डेव्हलपमेंट (पेडणे विकास) समितीच्या बॅनरखाली एकत्र येऊन पंचायत मंडळ व ग्रामस्थांना सोबत घेऊन नायजेरियन भाडेकरू म्हणून राहात असलेल्या निवासस्थानी धडक देऊन संबंधित घरमालकांना भेटून नायजेरियन भाडेकरूंना घर खाली करण्यास भाग पाडावे, अशा सूचना केल्या. तसेच पालये गावात एकाही नायजेरियन नागरिकाला यापुढे थारा न देण्याचा पवित्रा येथील युवावर्गाने घेतला आहे. या दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन परब यांनी अशा जटिल व गावाच्या हिताआड येणार्या गोष्टींसाठी आपण खंबीरपणे युवकांच्या लढय़ास पाठिंबा देऊन त्यांचे नेतृत्व स्वीकारीन याची ग्वाही दिली.नायजेरियन नागरिकांचे बेकायदा वास्तव्य, अमली पदार्थांचा व्यवहार, खुनशी प्रवृत्ती, येथील युवकांच्या अंगावर धावून येणे, धमक्या देणे या प्रकारांत वाढ झाली असल्याने हे गैरप्रकार इथपर्यंतच थांबणे गावाच्या दृष्टीने हिताचे आहे. गावाची सुरक्षितता म्हणून पंचायतीने या विषयाकडे गांभीर्याने पाहून कोणते नियोजन आखले आहे? असा प्रश्न सचिन परब यांनी पंचायत मंडळाला केला. यापूर्वी झालेल्या ग्रामसभेतील मागणीनुसार, नायजेरियन नागरिक वास्तव्यास असलेल्या संबंधित घरमालकांना पंचायतीने कायदेशीर नोटिसा काढल्या. त्याप्रमाणे काहींनी त्यांना घर खाली करण्यास सांगू, असे आश्वासन दिले. मात्र, याची कोणीच दखल घेतली नसल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले. नायजेरियनांपासून गावाला धोका असल्याने आठ दिवसांच्या आत घरे खाली करण्याची विनंती केली. या वेळी काही घरमालक भेटले तर काही भेटले नाहीत. पालयेतील तिघांच्या घरात नायजेरियन भाडेकरू म्हणून राहात आहेत. संबंधितांनी सूचना मान्य केल्या.फोटो ओळी-पालये (पेडणे) पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देताना (((((((((((((सरपंच रवींद्र परब.)))))))))))))) बाजूस उपसरपंच सुप्रिया गावडे, सचिव विलास कुंकळ्ळकर, पंच बाबली आरोलकर व प्रसाद परब.पालये (पेडणे) ग्रामसभेनंतर नायजेरियन नागरिकांना भाडेकरू म्हणून ठेवूनये हे घरमालकाला पटवून देताना सचिन परब, ((((((((((((((((((सरपंच गोपाळ परब))))))))))))))) व ग्रामस्थ. (छाया : लक्ष्मण ओटवणेकर)चौकट-इथेच नायजेरियनांच्या उपद्रवाची ठिणगी पडलीतीन दिवसांपूर्वी येथील युवक साईश परब रस्त्याच्या बाजूला उभा होता. त्या बाजूने आडदांड शरीरयष्टीचा नायजेरियन दुचाकीने जात असता साईशची नजर त्याच्यावर पडली. मात्र, तो नायजेरियन परतला व साईशच्या अंगावर धावून आला व खेकसला. त्यानंतर फोन करून त्याने आपल्या आणखी चार मित्रांना बोलावले. यानंतर आपण तेथून पळ काढल्याचे साईशने सांगितले.