पान 2 : महत्वाची बातमी आजच येणे आवश्यक
By admin | Published: October 3, 2015 12:20 AM2015-10-03T00:20:33+5:302015-10-03T00:20:33+5:30
कोलव्यातील अमेरकर यांचे
Next
क लव्यातील अमेरकर यांचे बांधकाम पाडण्याचा आदेश कायमहरित लवादाकडून शिक्कामोर्तब : 20 लाखांचा दंडही ठोठावलामडगाव : कोलवा येथील शेतजमिनीत भरती नियंत्रण रेषा कायद्याचे उल्लंघन करून उभारण्यात आलेले अमेरकर यांचे व्यावसायिक बांधकाम पाडण्यासंदर्भात गोवा भरती नियंत्रण प्राधिकरणाने दिलेला आदेश राष्ट्रीय हरित लवादाने कायम केला असून या आदेशाच्या विरोधात अमेरकर यांनी दाखल केलेला आव्हान अर्ज 20 लाखांचा दंड ठोठावत निकालात काढला.गुरुदास अमेरकर व अनामिका अमेरकर या दोघांनी भरती नियंत्रण रेषा प्राधिकरणाच्या आदेशाला हरित लवादाकडे आव्हान दिले होते. या लवादाचे अध्यक्ष व्ही. आर. किरणगावकर व डॉ. अजय देशपांडे यांच्या द्विसदस्यीय पिठाने 1 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निकालात हा आव्हान अर्ज फेटाळून लावताना 20 लाखांचा दंडही अमेरकर यांना ठोठावला. ही रक्कम चार आठवड्यांत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावी आणि या रकमेचा पर्यावरण संवर्धनासाठी वापर करण्यात यावा, असे या आदेशात म्हटले आहे. या दंडातील 2 लाखांची रक्कम याचिकादार ज्युडित आल्मेदा यांना दाव्याच्या खर्चापोटी देण्यात यावी, असेही म्हटले आहे.कोलवा येथील शेतजमिनीत अमेरकर दाम्पत्याने रेस्टॉरंट उभारल्यामुळे कोलवा सिव्हिक फोरमच्या आल्मेदा यांनी हे बांधकाम भरती रेषेपासून 200 ते 500 मीटर अंतरात असल्याचा दावा करून भरती नियंत्रण रेषा प्राधिकरणाकडे तक्रार नोंदविली होती. त्यानंतर हे बांधकाम पाडण्याचा आदेश प्राधिकरणाने दिला होता. या आदेशाला लवादासमोर आव्हान देताना अमेरकर कुटुंबाने आपण मच्छीमार असल्याने या बांधकामाला अभय देण्यात यावे, असा दावा केला होता. मात्र, अमेरकर हे कधीच मच्छीमारी व्यवसायात नव्हते, असा निष्कर्ष काढून लवादाने हा दावा फेटाळून लावला. (प्रतिनिधी)