पान २ : कुर्टी-खांडेपार सरपंच च्यारी विरोधात अविश्वास ठराव संमत
By admin | Published: May 5, 2015 01:21 AM2015-05-05T01:21:05+5:302015-05-05T01:21:05+5:30
फोंडा : कुर्टी-खांडेपारच्या सरपंच प्रिया च्यारी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव ६ विरुध्द ५ मतांनी संमत करण्यात आला. सहा सदस्यांनी च्यारी यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दाखल केली होती.
Next
फ ंडा : कुर्टी-खांडेपारच्या सरपंच प्रिया च्यारी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव ६ विरुध्द ५ मतांनी संमत करण्यात आला. सहा सदस्यांनी च्यारी यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दाखल केली होती. या ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीस निरीक्षक म्हणून हेमंत गावकर उपस्थित होते. चर्चेअंती ठरावावर घेतलेल्या मतदानात ६ विरुध्द ५ मतांना हा ठराव संमत झाला. ठरावाच्या बाजूने उपसरपंच नरेंद्र परब, पंच सुप्रिया गावडे, दीपा शंकर नाईक, नागेश नाईक, नविद तहसीलदार, मुल्ला यांनी मतदान केले तर विरोधक गटात सरपंच च्यारी यांच्यासह पंच संदीप खांडेपारकर, आनंद जल्मी, दीपा दीनानाथ नाईक, चंद्रिका कुर्टीकर यांचा समावेश होता. च्यारी यांच्या विरोधात ठराव संमत झाल्याने नरेंद्र परब यांच्याकडे पंचायतीचा तात्पुरता ताबा देण्यात आला आहे. नव्या सरपंचाची निवड लवकरच होणार आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)