पान 2 - छपाई कर्मचार्यांचे धरणे आंदोलन सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा
By admin | Published: August 3, 2015 10:31 PM2015-08-03T22:31:23+5:302015-08-03T22:31:23+5:30
Next
>फोटो आहे, वापराच........पणजी : सरकारी छपाई खात्याच्या कर्मचार्यांनी 26 महिन्यांचे थकलेले वेतन देण्याची मागणी करत एक तास धरणे आंदोलन केले. एप्रिल 2013 पासून कर्मचार्यांचा पगार थकित आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत तो मंजूर न केल्यास सप्टेंबर महिन्यात बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.छपाई कामगारांचा महिन्याचा दुसरा शनिवार, सार्वजनिक सु?ी, तसेच आठवड्याची सु?ी या दिवसांचे वेतन एप्रिल 2013 पासून दिले जात नाहीत. हे वेतन देण्यात यावे म्हणून अनेकवेळा कर्मचार्यांनी वरिष्ठांकडे मागणी केली होती. मात्र, याला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. सरकारने सप्टेंबरपर्यंत कर्मचार्यांचे थकित असलेले वेतन द्यावे, अशी मागणी कर्मचारी सुहास मांद्रेकर यांनी केली. या वेळी आयटकचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, अँड. सुहास नाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)