पान 2 - डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने सांतइस्तेव्ह मध्ये चिंता ------जोड बातमी

By admin | Published: August 12, 2015 12:35 AM2015-08-12T00:35:54+5:302015-08-12T00:35:54+5:30

इथल्या नागरिकांनी, पंचायत किंवा आरोग्य केंद्र यांच्यावरच जबाबदारी न सोडता, स्वत:ची जबाबदारी म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवावा तसेच अन्य बाबतीतही सहकार्य करावे. आमचे सहकार्य त्यांना सदोदित राहील, असे उद्गार सरपंच नोलास्को मिनेझिस यांनी काढले.

Page 2 - Worrying in Centennial due to Dengue Patient Disease ------ | पान 2 - डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने सांतइस्तेव्ह मध्ये चिंता ------जोड बातमी

पान 2 - डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने सांतइस्तेव्ह मध्ये चिंता ------जोड बातमी

Next
ल्या नागरिकांनी, पंचायत किंवा आरोग्य केंद्र यांच्यावरच जबाबदारी न सोडता, स्वत:ची जबाबदारी म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवावा तसेच अन्य बाबतीतही सहकार्य करावे. आमचे सहकार्य त्यांना सदोदित राहील, असे उद्गार सरपंच नोलास्को मिनेझिस यांनी काढले.
डॉ. एमी बोथेलो यांनी मलेरिया, फायलेरिया, डेंग्यू, चिकूनगुनिया, जपानी मेंदुज्वर याविषयी चलचित्रांद्वारे सविस्तर माहिती देऊन त्या विषयी घेण्याची काळजी व उपाय यावर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सिक्लेरिना गोन्साल्वीस यांनी, या जागृती शिबिरात विद्यार्थ्यांना माहिती दिल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले. विद्यार्थी जॉयनीता सिल्वेरा, देविता चोडणकर, जॉय जेकब यांनी या शिबिराबद्दल आपले विचार मांडले. सूत्रसंचालन सॅनिटरी इन्स्पेक्टर तुळशीदास नाईक यांनी व आभार पंकज सांगोडकर यांनी मानले. पंचायतीतर्फे बॅनर्स, नोटीसद्वारे या शिबिराविषयी जागृती करूनही नागरिक फिरकलेच नाहीत.
ओळी : सांत इस्तेव्ह येथील शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. ओसवाल्ड फर्नांडिस, बाजूस डॉ. एमी बोथेलो, डॉ. सॅलिना नोरान्हो, नोलास्को मिनेझिस, सिक्लेरिना गोन्साल्वीस, सॅबरिना परेरा, तुळशीदास नाईक. (फोटो : अर्णव, माशेल)

Web Title: Page 2 - Worrying in Centennial due to Dengue Patient Disease ------

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.