पान ३ नगराध्यक्ष मास्कारेन्हास यांनी भाजपाची चिंता वाढविली

By admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:58+5:302015-02-14T23:50:58+5:30

पद सोडण्यास नकार : कुंकळ्ळी पालिकेत सत्तानाट्य

Page 3 Chief of the President, Mascarenhas, raised concerns about the BJP | पान ३ नगराध्यक्ष मास्कारेन्हास यांनी भाजपाची चिंता वाढविली

पान ३ नगराध्यक्ष मास्कारेन्हास यांनी भाजपाची चिंता वाढविली

Next
सोडण्यास नकार : कुंकळ्ळी पालिकेत सत्तानाट्य
कुंकळ्ळी : कुंकळ्ळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष लँडी मास्कारेन्हस यांनी खुर्ची खाली न केल्याने भाजप समर्थक नगरसेवकांच्या गटातील चिंतेत भर टाकली आहे.
भाजप व मास्कारेन्हस गटात झालेल्या एका अलिखित कराराप्रमाणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नगराध्यक्षपदाची खुर्ची खाली करण्याचे आश्वासन मास्कारेन्हस यांनी भाजपा समर्थक नगरसेवकांना दिले होते. भाजपचे नगरसेवक नागेश चितारी यांच्यासाठी नगराध्यक्षपदाची खुर्ची सोडण्याचे आश्वासन मास्कारेन्हस यांनी कबूल केले होते. नगराध्यक्ष मास्कारेन्स यांनी आपल्या पदाचा राजिनामा न दिल्यामुळे भाजप समर्थक नगरसेवकांत सध्या मोठी चलबिचल दिसून येत आहे.
विद्यमान नगरसेवक लेन्ड्री मास्कारेन्हस हे भाजप नगरसेवकांच्या समर्थनाने नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर आरुढ झाले होते. कुंकळ्ळी नगरपालिकेत नऊ नगरसेवक निवडून आले होते. भाजपा समर्थक नागेश चितारी हे एकमेव नगरसेवक विरोधी गटातून निवडून आले होते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर गोव्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर चार नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपची दोस्ती केली होती. विद्यमान उपनगराध्यक्ष प्रेमदीप देसाई, मंगलदास गावकर, पोलिटा कार्मेरो व आणखी एका महिला नगरसेविकेने भाजपशी हातमिळवणी केली होती. मात्र भाजप समर्थक व काँग्रेस समर्थक नगरसेवक समान असल्यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष देेवेंद्र देसाई यांना नगराध्यक्षपदावरुन हटविण्याचे धाडस भाजप नगरसेवकांना झाले नव्हते. तत्कालीन काँग्रेस समर्थक गटाने लॅन्ड्री मास्कारेन्हस यांना नगराध्यक्षपद देण्याचा करार केला होता. मात्र त्या कराराप्रमाणे मास्कारेन्हस यांना नगराध्यक्षपद न लाभल्यामुळे विद्यमान नगराध्यक्ष लेन्ड्री मास्कारेन्हस व क्रोसी फर्नाडिस यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपशी हात मिळवणी करुन तत्कालीन नगराध्यक्ष देवेंद्र देसाई यांना यांना खुर्चीवरुन खाली खेचले होते.
मास्कारेन्हस यांनी एका अलिखित कराराप्रमाणे डिसेंबर महिन्यात खुर्ची खाली करण्याचे वचन भाजप समर्थकांना दिले होते. राहिलेले एक वर्ष नगराध्यक्ष म्हणून भाजपाचा कट्टर समर्थक नागेश चितारी यांनी नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविण्यास पालिकेतील सात नगरसेवक राजी झाले होते. मात्र, कार्यकाळ संपूनही विद्यमान नगराध्यक्ष मास्कारेन्हस खुर्ची सोडत नसल्याचे पाहून भाजप समर्थक नगरसेवकांपुढील अडचण वाढली आहे. मास्कारेन्हस यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याएवढे संख्याबळही भाजपकडे नसल्यामुळे एकडे आड व तिकडे विहीर अशी स्थिती या नगरसेवकांची झाली आहे. (प्रतिनिधी)


Web Title: Page 3 Chief of the President, Mascarenhas, raised concerns about the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.