पान 3 : वाहन पार्किंगसाठी जागा नसल्याने पार्किंगचा बोजवारा कायम : शिरवईकर
By admin | Published: September 1, 2015 09:38 PM2015-09-01T21:38:22+5:302015-09-01T21:38:22+5:30
मडगाव : शहरात वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे; परंतु वाहन पार्किंगसाठी जागा नसल्याने वाहनचालकांची बरीच कुचंबणा होत आहे यावर तोडगा काढण्यासाठी पालिका मंडळ प्रय} करीत असले तरी अद्याप त्याच्या प्रय}ांना यश येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारवाईला वाहनचालकांना तोंड द्यावे लागत आहे.
Next
म गाव : शहरात वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे; परंतु वाहन पार्किंगसाठी जागा नसल्याने वाहनचालकांची बरीच कुचंबणा होत आहे यावर तोडगा काढण्यासाठी पालिका मंडळ प्रय} करीत असले तरी अद्याप त्याच्या प्रय}ांना यश येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारवाईला वाहनचालकांना तोंड द्यावे लागत आहे.मडगावात वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी सुमारे अठरा ठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पैकी पंधरा कॅमेरे कार्यरत आहेत. या कॅमेर्यांच्या माध्यमातून बेशिस्त पार्किंग, तसेच नो एन्ट्री, नो पार्किंग जागेत पार्क केलेल्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यात येत असून या वाहनांचा फोटो काढून संबंधित वाहतूक नियमांचा भंग करणार्या वाहनमालकाच्या पत्त्यावर दंडाची प्रत पाठविण्यात येते. याचा फटका खुद्द पोलिसांना तसेच काही पत्रकारांनाही बसला असल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या.मडगावात वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पालिकेजवळ अनेक वेळा बैठक घेऊन चर्चा केली; परंतु आम्हाला पालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही, असे वाहतूक पोलीस निरीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी सांगितले. बेशिस्त वाहने पार्क केलेल्या वाहनांचे फोटो काढून वाहतूक पोलीस मुख्यालयात पाठविले जातात व अशा वाहनमालकांना दंड प्रत घरपोच पाठविण्यात येते, असे त्यांनी सांगितले. वाहतूक पोलीस उपअधीक्षक गुरुप्रसाद म्हापणे यांना विचारले असता बेशिस्त पार्किंगच्या विरोधात कडक कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. खास करून शहरात वाहतूक करणार्या शहरी बसेस अधिकृत बस थांब्यावर न थांबता प्रवासी तिथे थांबा घेत असून अनाधिकृत बस थांबा घेत असल्याने अशा बसेसवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाला अनधिकृत बस थांबा घेणार्या बसेसची यादीच सादर केली आहे. कदंब बसस्थानकावरून दवर्लीला जाणारी बस 45 मिनिटांनी पोहोचते. त्यामुळे प्रवासी वाहतूक पोलिसांना दोष देतात. खरे म्हणजे या शहरी बसेस प्रत्येक बस थांब्यावर नांगर टाकून प्रवासी मिळवण्यासाठी थांबत असतात व वाहतूक पोलिसांना दोष देतात हे चुकीचे आहे. एकाच जागी बराचवेळ बस थांबा घेत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असते. (प्रतिनिधी)ढँ3 : 0109-टअफ-05कॅप्शन: लोहिया मैदानाजवळ नो पार्किंगच्या जागेत पार्क केलेली चारचाकी वाहने.(छाया: पिनाक कल्लोळी)ढँ3 : 0109-टअफ-06कॅप्शन: पिकअप स्टँडजवळ दुचाकी पार्किंगच्या जागेत पार्क केलेली वाहने. (छाया: पिनाक कल्लोळी)ढँ3 : 0109-टअफ-07कॅप्शन: अपुर्या पार्किंगमुळे वाहनांना अशाप्रकारे रस्त्यावरच ठाण मांडून राहावे लागते. (छाया: पिनाक कल्लोळी)ढँ3 : 0109-टअफ-08कॅप्शन: पार्किंगच्या शोधात असलेले वाहनचालक. (छाया: पिनाक कल्लोळी)