पान 3 : जनविरोधी धोरणांचा निषेध

By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:44+5:302015-08-26T23:32:44+5:30

- 2 सप्टेंबरला अखिल भारतीय सार्वत्रिक संप

Page 3: Prohibition of anti-people policies | पान 3 : जनविरोधी धोरणांचा निषेध

पान 3 : जनविरोधी धोरणांचा निषेध

Next
- 2
सप्टेंबरला अखिल भारतीय सार्वत्रिक संप
फोंडा : केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी बुधवार, दि. 2 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय सार्वत्रिक संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सर्व राष्ट्रीय कामगार संघटना, स्वतंत्र महासंघ आणि जनसंस्था यांनी बुधवारी फोंड्यात झालेल्या बैठकीत केले.
या बैठकीला आयटकचे उपव्यवस्थापक राजू मंगेशकर, सहसचिव ख्रिस्तोफर फोन्सेका, अध्यक्ष प्रसन्न उटगी, सचिव अँड. सुहास नाईक, तसेच गणेश कुबल, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हृदयनाथ शिरोडकर, खासगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर उपस्थित होते. या वेळी फोन्सेका म्हणाले की, हा संप म्हणजे भाजपच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या रालोआ सरकारच्या धोरणांना करण्यात येणारा विरोध आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस, कामगार, शेतकरी, छोटे व्यापारी, दुकानदार आणि इतरांचे मोठे नुकसान झाले आहे. कामगार धोरण बदलाच्या नावाखाली सध्याच्या कामगार कायद्यात केलेले बदल, खाद्यपदार्थांच्या दरातील अनियमित वाढ, उद्योगामध्ये झालेला विदेशी गुंतवणुकीचा शिरकाव याविरुद्ध आवाज उठविण्यात येणार आहे. 2 सप्टेंबर रोजी होणार्‍या देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.
खासगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर म्हणाले की, केंद्रातील रालोआ सरकारने देशातील खासगी क्षेत्र, वाहतूक क्षेत्र नष्ट करण्यासाठी पार्लमेंटमध्ये रस्ता वाहतूक आणि सुरक्षा विधेयक सादर करण्याचा प्रयत्न चालवला असून सरकारच्या विधेयकामुळे मोठय़ा प्रमाणात बेकारी निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. यासाठी या बंदमध्ये वाहतूक क्षेत्रातील सर्वांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने वाहतूकविषयक जारी केलेली सर्व कलमे रद्द करून रस्ता वाहतूक आणि सुरक्षा विधेयक 2015 ला नकार द्या तसेच हे विधेयक परत घ्या, अशी मागणी अखिल गोवा वाहतूक चालक कृती समितीतर्फे करण्यात आली आहे.

Web Title: Page 3: Prohibition of anti-people policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.