पान ३ : पुंडलिक नाईक यांचा राष्ट्रीय स्तरावर ठसा महादेव नाईक : गौरव विशेषांकाचे प्रकाशन
By admin | Published: May 5, 2015 01:21 AM2015-05-05T01:21:21+5:302015-05-05T01:21:21+5:30
(फोटो अत्री देणार)
Next
(फ ोटो अत्री देणार)कॅप्शन लॅफ्ट टू राईट: भिकू नायक, पुंडलिक नाईक, महादेव नाईक, हनुमंत चोेपडेकर आणि प्रा. सत्यवान नायक.पणजी : साहित्यिक पुंडलिक नाईक हा गोव्याचा चमकता तारा आहे. त्यांनी स्वत:चा ठसा गोव्यातच नव्हे, तर देशात उमटवलेला आहे. लिखाणात लेखकाने रममाण होणे आवश्यक आहे; कारण हे साहित्य नवीन पिढीसाठी मार्गदर्शक ठरत असते, असे प्रतिपादन उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी केले.जैत प्रकाशनतर्फे पाटो येथील संस्कृती भवनच्या सभागृहात सोमवारी आयोजित पुंडलिक नाईक यांच्या गौरव विशेषांक प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. या वेळी जैत प्रकाशनचे प्रकाशक भिकू नाईक, साहित्यिक पुंडलिक नाईक, हनुमंत चोपडेकर व प्रा. सत्यवान नाईक उपस्थित होते. उद्योगमंत्र्यांच्या हस्ते गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.उद्योगमंत्री म्हणाले की, स्वत:चे वैवाहिक जीवन संभाळत असतानाच त्यांची समाजासाठी स्वत:ला झोकून दिले. गोव्यातील प्रतिभावंत लेखकांसाठी सकहार्य करण्यास सतत कार्यशील असणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी पुंडलिक नाईक यांनी सांगितले की, लिखाण करताना ती आवड आणि हौस म्हणून केले नाही की व्यवहार म्हणून. गौरव विशेषांक हा व्यक्तीचा गौरव नसून कोकणी भाषेचा गौरव आहे. चरित्र लिखाण करतेवेळी लेखकाने मन मोकळे ठेवून लिखाण करणे आवश्यक आहे. माणसे संकुचित असतात; पण लिखाणात हा संकुचितपणा न येता लेखकाने व्यापक होणे आवश्यक आहे. लेखकामध्ये मनाचा मोठेपणा असणे आवश्यक आहे. कोकणीत केलेल्या लिखाणाची गरच सध्या युवा पिढीला आहे.