पान ३ : वीज बिलांची वाढ मागे घ्या
By Admin | Published: July 3, 2015 11:00 PM2015-07-03T23:00:06+5:302015-07-03T23:00:06+5:30
अन्यथा वीज कार्यालयावर मोर्चा नेण्याचा गाडेवाल्यांचा इशारा
अ ्यथा वीज कार्यालयावर मोर्चा नेण्याचा गाडेवाल्यांचा इशारामडगाव : सरकारने भरमसाट वाढविलेली वीज बिले त्वरित कमी न केल्यास वीज खात्यावर मोर्चा नेऊन अधिकार्यांना घेराव घालण्याचा ठराव मडगाव गाडा टे्रडर्स संघटनेने शुक्रवारी झालेल्या गाडेवाल्यांच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर केला.भरमसाट वाढलेल्या वीज बिलांच्या समस्येवर विचार करण्यासाठी गाडा टे्रडर्स संघटनेने बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी व्यासपीठावर फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, गाडा मालक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, नगरसेवक अविनाश शिरोडकर, न्यू मार्केट टे्रडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.आमदार विजय सरदेसाई यांनी या वेळी राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकारला आम आदमीची कदर नसून सामान्य जनतेने ज्या अच्छे दिनांची अपेक्षा केली होती ती फोल ठरली असून, भाजपा सरकारने राज्यात व देशात केवळ बुरे दिन आणल्याची टीका केली.वीज बिलांत जी भरमसाट वाढ केलेली आहे ती एकतर्फी असून, लोकांच्या हरकती ऐकून न घेता वीज बिलांचा मोठा शॉक सरकारने आम आदमीला दिला आहे. या अन्यायाच्या विरोधात सर्वांनी एकत्रितपणे लढा दिला पाहिजे, असे सरदेसाई यांनी पुढे सांगितले. तसेच सरकारने वीज रेग्युलेटरी समितीच्या शिफारशीवरून जरी ही वीज बिल वाढ केली असली तरी याबाबत सर्व प्रक्रिया लोकांना न कळता केल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.पूर्वी कमीतकमी बिल पंच्चावन्न रुपये होते, ते वाढवून चारशे रुपये केले आहे. वीज बिलांत भरमसाट वाढ केली असून सरकारने सामान्य जनतेची लूट चालविल्याचे सरदेसाई म्हणाले. ज्या गाडेवाल्यांचे गाडे पाडले होते, त्यांच्या पुनर्वसनाचे कामही सरकारने पूर्ण केले नसून वीज बिलांचा व गाडेवाल्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर आपण विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. सरकारने वीज बिलांमध्ये सुमारे ३५ टक्के रक्कम विविध इतर करांपोटी ठेवलेली असून ही रक्कम कमी करणे सरकारच्या हातात असल्याचे ते म्हणाले. विजेच्या बिलांबद्दल सरकारने सकारात्मक विचार न केल्यास आपण सर्वांनी एकत्रितपणे लढा देण्यास पुढे आले पाहिजे, असे ते म्हणाले.गाडामालक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सरकार गरीब गाडेवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कटकटी करीत आहे. मात्र, मोठ्या हॉटेलमालकांना बेकायदेशीर हॉटेल उभी करण्यासाठी झुकते माप देत आहे. हा अन्याय असून गाडेवाल्यांबरोबरच सामान्य जनतेचे कंबरडे मोडणारी वीज बिलांची वाढलेली किंमत मागे घ्यावी, असे आवाहन केले. वीज बिलांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविण्याची विनंती गाडेमालक संघटना चाळीसही आमदारांना करणार असून वीज बिलवाढ मागे न घेतल्यास विधानसभा अधिवेशनानंतर वीज खात्यावर मोर्चा नेण्याचा इशाराही नाईक यांनी या वेळी दिला.(प्रतिनिधी)ढँङ्म३ङ्म : 0307-टअफ-09कॅप्शन: गाडा असोसिएशनच्या बैठकीत बोलताना आमदार विजय सरदेसाई. सोबत आमदार आलेक्स रेजिनाल्ड, नगरसेवक अविनाश शिरोडकर, गाडा मालक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक व इतर. (छाया: अरविंद टेंगसे)चौकटवीज खात्याच्या वेबसाईटवर निरोधाची माहिती-ग्राहकांना देण्यात येत असलेल्या वीज बिलांच्या मागे माहिती मिळविण्यासाठी एक वेबसाईट दिलेली आहे. ही वेबसाईट उघडल्यास या वेबसाईटवर निरोधाचा वापर कसा करावा याची माहिती मिळते, अशी माहिती आपल्याला एका माजी मुख्यमंत्र्यांनीच दिल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी या वेळी सांगितले.