पान ४ दोशी पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करा

By admin | Published: May 9, 2015 01:44 AM2015-05-09T01:44:54+5:302015-05-09T01:44:54+5:30

द सिटीझन ऑफ आबंावली ॲण्ड कुंकळळी संघटनेचे मागणी : केगदीक˜ा अपघात प्रकरण

Page 4 Doshi Suspend the police officer | पान ४ दोशी पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करा

पान ४ दोशी पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करा

Next
सिटीझन ऑफ आबंावली ॲण्ड कुंकळळी संघटनेचे मागणी : केगदीक˜ा अपघात प्रकरण
मडगाव : केगदीक˜ा येथील अपघाताला पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. जोपर्यंत दोषी पोलीस अधिकार्‍यांना निलंबीत करुन या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची लेखी हमी मुख्यमंत्री देत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा द सिटीझन ऑफ आबंावली ॲण्ड कुंकळळी संघटनेने दिला आहे.
मडगावात शुक्रवारी या संघटनेने पत्रकार परिषद घेउन अपघाताला कारणीभूत असलेले वाहन आमदार बेंजामिन सिल्वा यांच्या नातेवाईकांचे असल्याने पोलिस या प्रकरणात गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला. गेल्या सोमवारी एका मासळीवाहू ट्रकच्या चाकाखाली सापडून ॲलिस्टन फर्नांडीस हा दुचाकीचालक ठार झाला होता.
दरम्यान, आरोपांचे आमदार सिल्वा यांनी खंडन केले आहे. घटनेच्या दिवसांपासून या वाहनाच्या मालकाला भेटलोही नाही. विरोधक आपल्याविरुध्द राजकीय षडयंत्र रचत आहेत. कायद्यापुढे सर्व गोष्टी उघड होतील असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत डॉ. जर्सन फर्नांडीस, आंबावली पंचायतीचे माजी सरपंच महेंद्र बाळे, ताराचंद्र देसाई व मयताचे नातेवाईक उपस्थित होते. उपअधिक्षक मोहन नाईक, कुंकळळीचे पोलीस निरीक्षक राम आसरे,सहायय्क पोलीस उपनिरीक्षक रमाकांत वेळीप व पोलीस शिपाई निलेश देसाई यांना निलंबीत करावे अश्ी मागणी या संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. नि:पक्षपातीपणे या प्रकरणाची न्यायालयानी चौकशी करुन या सर्व अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवावा.
अपघातस्थळी वाहननियमाचे फलक व गतीरोधक बसवावे व ज्या १५ स्थानिक व ३00 अनोळखींवर बोगस गुन्हे दाखल केले आहे ते मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे.
अपघातस्थळी नाकाबंदीसाठी बेरेकेडस उभारले होते असे पोलिसांनी सांगितले. मात्र, तेथे पोलीस का नव्हते याचे उत्तर मिळत नाही, तसेच अपघात झाल्यानंतर तेथून बॅरेकेडस हटविले याकडेही या संघटनेने लक्ष वेधले आहे.
पंचनामा करताना पोलिसांकडे साधी टेपही नव्हती. जीपमध्ये पेट्रोल नसल्याने पोलीसांना दुचाकीवरुन यावे लागले असे पोलीस निरीक्षक सांगतात. हे लज्जास्पद असल्याचे डॉ. फर्नांडीस म्हणाले. अपघातस्थळावरील सांडलेले रक्त धुण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी आणण्यात आली होती हे पटणारे नाही. निलेश देसाई हा सीआयडी पोलीस अपघातस्थळी येउन विमा मिळेल तो घ्या असे सांगत होता, त्यामुळे या अपघाताच्या तपासाबाबत पोलीस किती गंभिर आहेत हे उमजते असे त्यांनी सांगितले.
ज्या लोकांना पोलिसांनी साक्षिदार म्हणून ठेवले त्यांच्याविरुध्दचे गुन्हे नोंद केलेले आहे, हाही एक विरोधाभास आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Page 4 Doshi Suspend the police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.