पान 4 - दहावीच्या विद्यार्थ्यांचेही धरणे
By Admin | Published: September 3, 2015 11:05 PM2015-09-03T23:05:46+5:302015-09-03T23:05:46+5:30
पेडणे : ज्या झाडांचे फणस, आंबे, काजू विकून आई-वडिलांनी आपल्याला कपडे, बूट, पुस्तके, व?ा आणून दिल्या ती 450 झाडे कापून सरकारने आमच्या कुटुंबीयांवर अन्याय केला आहे, हा दावा आहे मागच्या 4 दिवसांपासून पेडणे येथे धरणे धरून बसलेल्या अमरनाथ नाईक कुटुंबातील दहावीत शिकणार्या विनायक नाईक याचा. गेले चार दिवस तो शाळेला दांडी मारून येथे कुटुंबीयांसोबत धरणे धरून बसला आहे.
प डणे : ज्या झाडांचे फणस, आंबे, काजू विकून आई-वडिलांनी आपल्याला कपडे, बूट, पुस्तके, व?ा आणून दिल्या ती 450 झाडे कापून सरकारने आमच्या कुटुंबीयांवर अन्याय केला आहे, हा दावा आहे मागच्या 4 दिवसांपासून पेडणे येथे धरणे धरून बसलेल्या अमरनाथ नाईक कुटुंबातील दहावीत शिकणार्या विनायक नाईक याचा. गेले चार दिवस तो शाळेला दांडी मारून येथे कुटुंबीयांसोबत धरणे धरून बसला आहे.मागच्या 4 दिवसांपासून आपले कुटुंबीय पेडणे येथे धरण्यास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपणही हायस्कूलला चार दिवस दांडी मारून धरण्याला बसलो. एका बाजूने मला माझ्या अभ्यासाची काळजी आहे, तर दुसर्या बाजूने उत्पन्न देणार्या झाडांची कत्तल केल्याचे दु:ख आहे. यासाठी गेले 4 दिवस आई, वडील, मोठा भाऊ व बहीण यांच्यासमवेत धरण्याला बसलो. मात्र, शुक्रवारी आपण शाळेत जाणार, असे विनायक याने सांगितले.नियोजित तुये इलेक्ट्रॉनिक सिटीकडे जाण्यासाठी विर्नोडा येथून रस्ता बनवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर चालू आहे. त्या जागेतील उत्पन्न देणारी झाडे कापल्याने आपल्या उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्यामुळे सरकारने आम्हाला न्याय द्यावा, यासाठी गेले 4 दिवस अखंडितपणे पेडणे शासकीय इमारतीसमोर अमरनाथ नाईक आपल्या कुटुंबीयांसहित धरणे आंदोलनास बसले आहेत. (प्रतिनिधी)फोटो : कुटुंबीयांसह धरणे धरून बसलेला विनायक नाईक.(छाया : निवृत्ती शिरोडकर)