पान 4-मालवणातील शिक्षिकेचा गोमेकॉत तापाने मृत्यू
By admin | Published: August 25, 2015 10:46 PM2015-08-25T22:46:41+5:302015-08-25T22:46:41+5:30
प्लेटलेट्स झाल्या कमी : पाच महिन्यांच्या होत्या गरोदर
Next
प लेटलेट्स झाल्या कमी : पाच महिन्यांच्या होत्या गरोदरमालवण : शहरातील दांडी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका नाजुकबी पीरसाहेब शेख (वय 28) यांचा तापाने बांबोळी येथील गोमेकॉत उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. शेख यांना ताप येत असल्याने शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊन प्रकृती चिंताजनक बनल्याने बांबोळी येथे हलविण्यात आले होते. त्या पाच महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांच्या निधनाने दांडी परिसरासह तालुका शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. शेख या तालुक्यात शिक्षण सेवक म्हणून एक वर्षापासून सेवा बजावत होत्या. त्यानंतर त्यांची दांडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचे पती जावेद शेख हे वायरी भूतनाथ शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावतात. शेख यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. त्या आपल्या कुटुंबासमवेत रेवतळे परिसरात राहात होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आल्याने कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्याने बांबोळी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले होते. (प्रतिनिधी)चौकटदांडी शाळेत र्शद्धांजलीशेख यांच्या निधनानंतर दांडी शाळा येथे मुख्याध्यापिका साळगावकर, नगरसेविका सेजल परब, मेघनाथ धुरी, नारायण धुरी तसेच शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी र्शद्धांजली वाहिली. मालवण तालुका परीक्षा समितीच्या वतीनेही शिष्यवृत्तीधारकांच्या सत्कार समारंभात र्शद्धांजली वाहण्यात आली.