पान 4 : मुरगाव पालिकेची थकबाकी 10 कोटींवर
By admin | Published: August 11, 2015 11:16 PM2015-08-11T23:16:04+5:302015-08-11T23:16:04+5:30
प्रशासन गाफिल :
Next
प रशासन गाफिल : वास्को : मुरगाव पालिकेची थकबाकी वसुलीची मोहीम पाच महिन्यांपासून थंडावलेली आह़े त्यामुळे थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून ही तब्बल 10 कोटींवर पोहचली आह़े शहरात पालिकेच्या मालकीच्या काही इमारती असून त्यामध्ये फ्लॅटधारक व काही दुकानदारांचा समावेश आह़े पालिकाने काही वर्षांपूर्वी फ्लॅटधारकांच्या तसेच दुकानदारांच्या घरभाड्यात मोठया प्रमाणात वाढ केली होती़ मात्र, ही भाडेवाढ दुकानदारांना तसेच फ्लॅट धारकांना अमान्य होती़ त्यामुळे त्यांनी मंडळाला कित्येक वर्षांपासून भाडे दिले नव्हते. मुरगाव नगरपालिका मंडळातर्फे निश्चित केलेला घरभाडे वाढीचा ठराव मंजुरीसाठी नगरपालिका संचालकांना पाठविण्यात आला होता़ पण हा ठराव अनेक महिन्यापासून नगरपालिका संचालनालयाच्या कार्यालयातील शीतपेटीत धूळ खात पडलेला आहे. त्यामुळे भाडेकरूनी वाढीव दराने भाडे भरण्यास नकार दिला होता़ याबाबत भाडेकरूनी येथील सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली होती़ तसेच हा निकाल भाडेकरूंच्या बाजूने लागला होता़ तरीही भाडेकरूनी जुन्या दराने तसेच नगरपालिका संचालकांची मंजुरी मिळाल्यानंतर अंमलात आलेली वाढीव दरातले भाडे भरण्यास कोणताच पुढाकार घेतला नाही़ दरम्यान, भाडेकरूकडून ही थकबाकी वसुल करण्यासाठी मंडळातील नगरसेवकांनी व मंडळातील अधिकार्यांनी कोणतीच ठोस पाऊले उचलली नाही. परंतु मागील वर्षी पालिकेच्या मुख्य अधिकारी पदावर जगन्नाथ बी़ भिंगी यांची नियुक्ती झाली. तेव्हा भिंगी त्यांनी थकबाकीचा विषय गांभीर्याने घेतला होता. शिवाय आर्थिक वर्षांच्या अखेरीस काही प्रमाणात लाखो रूपये नगरपालिकेच्या तिजोरीत जमा केला होता. मात्र, गेल्या मे महिन्यात त्यांची निवृत्ती झाल्यानंतर हा थकबाकीची मोहिम थंडावली. त्याचबरोबर विद्यमान पालिका मंडाळातर्फे थकबाकी वसुलीकडे पूर्तता कानाडोळा केला आहे. शिवाय थकबाकीत दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे पालिकेने त्वरित कारवाई करून हालचाली न केल्यास पालिकेची आर्थिक स्थिती कोलमडू शकते. (प्रतिनिधी)चौकट : नगरसेवक निवडणूकीच्या तयारीत..आता नगरपालिकेच्या निवडणूकाजवळ आल्याने नगरसेवक व्यूहरचना आखण्यात व्यस्थ आहेत. तसेच पालिकेच्या प्रभागांची रचना आणि राखीवता जाहीर करण्यात आली नाही. तरीही नगरसेवकांनी स्वत: तर्कविर्तक बांधून त्यादृष्टिने पावले उचललेली आहेत. काही नगरसेवकांनी सत्ता संपुष्टात आल्याचे गृहीत धरून पालिकेत येणे बंद व कारभारात लक्ष देणे थांबविले आहे. त्यामुळे पालिकेची थकबाकी वसुल करण्याची जवाबदारी निवडून येणार्या मंडळाला करावे लागणार आहे.