पान 5 : ‘वन रँक, वन पेन्शन’ निर्णयाचे स्वागत : सावईकर
By admin | Published: September 8, 2015 02:08 AM2015-09-08T02:08:30+5:302015-09-08T02:08:30+5:30
मडगाव : ‘वन रँक, वन पेन्शन’ या मागणीसाठी माजी सैनिक गेली 40 वर्षे सातत्याने कार्यरत होते. अखेर केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मागणी मान्य करून माजी सैनिकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या या धाडसी निर्णयाचे दक्षिण गोव्याचे खासदार तथा भाजपाचे राज्य सरचिटणीस अँड. नरेंद्र सावईकर यांनी स्वागत केले आहे.
Next
म गाव : ‘वन रँक, वन पेन्शन’ या मागणीसाठी माजी सैनिक गेली 40 वर्षे सातत्याने कार्यरत होते. अखेर केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मागणी मान्य करून माजी सैनिकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या या धाडसी निर्णयाचे दक्षिण गोव्याचे खासदार तथा भाजपाचे राज्य सरचिटणीस अँड. नरेंद्र सावईकर यांनी स्वागत केले आहे.संरक्षणमंत्री र्पीकर हे धाडसी निर्णय घेण्यात मातब्बर आहेत. त्याचीच पुनरावृत्ती करताना त्यांनी ‘वन रँक, वन पेन्शन’ संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या मुकुटात आणखी एक मानाचा शिरपेच खोवल्याचे खासदार सावईकर यांनी म्हटले आहे. सैनिकांच्या 40 वर्षांच्या मागणीवर तोडगा काढणे ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट असून तमाम गोवेकरांनाही संरक्षणमंत्री र्पीकर यांच्याबद्दल अभिमान असल्याचे खासदार सावईकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)