पान 7 : अखिल गोवा मराठी वक्तृत्व स्पर्धा

By Admin | Published: August 13, 2015 12:50 AM2015-08-13T00:50:34+5:302015-08-13T00:50:34+5:30

फोंडा : गोमंतक मराठी भाषा परिषदेतर्फे कै. बाळकृष्ण वामन सावर्डेकर स्मृती अखिल गोवा पातळीवर मराठी वक्तृत्व स्पर्धा उच्च माध्यमिक व माध्यमिक गटात घेतली जाणार आहे. ही स्पर्धा दि. 20 ते 28 ऑगस्ट रोजी केंद्र पातळीवर बाराही तालुक्यांत घेतली जाणार आहे. केंद्र पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी 30 ऑगस्ट रोजी आल्मेदा हायस्कूल, फोंडा येथे घेतली जाणार आहे. उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा थेट 30 ऑगस्ट रोजी थ्रीफ्ट को ऑप. सोसायटीच्या सभागृहात घेतली जाणार आहे. स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे- उच्च माध्यमिक गट- आचार्य धर्मानंद कोसंबी, डॉ. भाऊ दाजी लाड, डॉ. प्रेमानंद रामाणी, जयप्रकाश नारायण, डॉ. प्रकाश आमटे. माध्यमिक गट- स्वच्छ भारत, माझा आदर्श शिक्षक, देशी खेळांचे महत्त्व. उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयीन गट- राजकीय आणीबाणी परत येऊ शकते का,

Page 7: All-India Marathi Oratory Competition | पान 7 : अखिल गोवा मराठी वक्तृत्व स्पर्धा

पान 7 : अखिल गोवा मराठी वक्तृत्व स्पर्धा

googlenewsNext
ंडा : गोमंतक मराठी भाषा परिषदेतर्फे कै. बाळकृष्ण वामन सावर्डेकर स्मृती अखिल गोवा पातळीवर मराठी वक्तृत्व स्पर्धा उच्च माध्यमिक व माध्यमिक गटात घेतली जाणार आहे. ही स्पर्धा दि. 20 ते 28 ऑगस्ट रोजी केंद्र पातळीवर बाराही तालुक्यांत घेतली जाणार आहे. केंद्र पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी 30 ऑगस्ट रोजी आल्मेदा हायस्कूल, फोंडा येथे घेतली जाणार आहे. उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा थेट 30 ऑगस्ट रोजी थ्रीफ्ट को ऑप. सोसायटीच्या सभागृहात घेतली जाणार आहे. स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे- उच्च माध्यमिक गट- आचार्य धर्मानंद कोसंबी, डॉ. भाऊ दाजी लाड, डॉ. प्रेमानंद रामाणी, जयप्रकाश नारायण, डॉ. प्रकाश आमटे. माध्यमिक गट- स्वच्छ भारत, माझा आदर्श शिक्षक, देशी खेळांचे महत्त्व. उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयीन गट- राजकीय आणीबाणी परत येऊ शकते का, पंतप्रधान मोदींचे अच्छे दिन, गोमंतकात कोकणी वृत्तपत्र का चालत नाही. तालुका पातळीवरील केंद्र, दिवस व वेळ पुढीलप्रमाणे-
सरकारी हायस्कूल, सदर फोंडा दि. 20 रोजी दुपारी 3 वाजता. एडीइआय ऑफिस वाळपई- दि. 21 रोजी सकाळी 10 वाजता, माता सेकंडरी हायस्कूल, बायणा वास्को -दि.24 रोजी सकाळी 10वाजता. स. प्रा. विद्यालय, डिचोली- दि. 25 रोजी दुपारी 3 वाजता. एडीईआय ऑफिस पेडणे- दि. 26 रोजी सकाळी 10 वाजता, सारस्वत विद्यालय म्हापसा- दि. 27 रोजी दुपारी 3 वाजता. मुष्टिफंड हायस्कूल पणजी- दि. 28 रोजी दुपारी 4 वाजता, कात्यायनी बाणेश्वर हायस्कूल, काणकोण -दि. 28 रोजी सकाळी 10 वाजता. अधिक माहितीसाठी अध्यक्ष मोहन कामत किंवा आयोजन प्रमुख कल्लाप्पा मनवाडकर यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Page 7: All-India Marathi Oratory Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.