पान ७- हरमल ग्रामसभेत विकासकामांवर चर्चा
By admin | Published: July 22, 2015 12:34 AM2015-07-22T00:34:17+5:302015-07-22T00:34:17+5:30
हरमल : हरमलची ग्रामसभा सरपंच सुवर्णा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली.
Next
ह मल : हरमलची ग्रामसभा सरपंच सुवर्णा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली.पंचायत सचिव प्रितम सावंत यांनी इतिवृत्त वाचले. त्यास संजय नाईक व आलेसिन रॉड्रिग्स यांनी अनुमती दिली. मागील ग्रामसभेतील ठरावाची कार्यवाही झाली का, अशी विचारणा करताना अद्याप थोडी व्हायची असल्याचे उपसरपंच प्रदीप नाईक यांनी सांगितले. सर्व प्रभागातील गटारे, ओहोळ तसेच रस्त्याशेजारील झुडपे, रस्त्यावरील माती हटविण्याची कामे झाल्याचे सांगितले. दरम्यान, रस्त्यावर कित्येक नागरिक रेती, दगड ठेवतात व स्वत:चे काम झाल्यानंतर रस्त्यावरील माती तशीच ठेवतात. याबाबत पंचायतीने संबंधितांना ताकीद देऊन त्यांच्याकडूनच ती साफ करून घ्यावी, असे ठरविण्यात आले. त्यासाठी प्रत्येक प्रभागातील पंचायत सदस्यांनी याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपसरपंच ठाकूर यांनी केले.पर्यटन हंगामात समुद्रकिनारपीच्या २०० मीटर अंतरात व्यावसायिक पंचायत खात्याच्या नियमानुसार, व्यवसाय करू शकणार नाहीत. सीआरझेडकडून ना हरकत दाखले आणणे कठीण असल्याने पंचायतीस महसूल कमी येईल, अशी माहिती डिमेलो यांनी दिली व त्यासाठी व्यवसाय शुल्क वाढविण्याची मागणी त्यांनी केली. घरपीबरोबरच वीज शुल्क पंचायत ग्रामस्थांकडून वसूल करते; परंतु वीज खाते पथदीपाचे बिल स्वत: भरते, तर ग्रामस्थांकडून वीज शुल्क का आकारते, असा सवाल नागरिक टोनी डिमेलो यांनी केला. तसेच वीज शुल्क हे सार्वजनिक रस्त्यावरील पथदीपांसाठी वसूल करीत असल्यास जर वीज खाते बिल भरते तर हा कर जमा करू नये, असे सांगितले.वृक्षारोपणाबद्दल अभिनंदनपंचायतीने किनारपी भागात मच्छीमार बांधवांच्या सहाय्याने वन खात्याच्या मार्गदर्शनानुसार, वृक्षारोपण केल्याने पंचायत मंडळ, वन खाते व ग्रामस्थांचा अभिनंदन ठराव नागरिकांनी मांडला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. वृक्षारोपणामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील व पर्यायाने येथील व्यवसायात वाढ होईल, यासाठी पंचायत आग्रही असल्याबद्दल ग्रामस्थांनी अभिनंदन केले. पंचायतीचे तीन कर्मचारी अधिक काळ रजा न घेता पंचायतीसाठी राबतात त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांना पंचायतीतर्फे भेटवस्तू देण्याचे ठरविले.पंचायत क्षेत्रातील किनारपी भागात अत्यंत गरजेच्या मलनिस्सारण सुविधा उपलब्ध करण्याबाबत नागरिक झेपेरिन रॉड्रिग्स यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडली व पुढील ग्रामसभेत त्यांचा सविस्तर ठराव सादर करण्याचे ठरविले. गिरकरवाडा येथील ओहोळात कचरा साचल्याने पंचायतीने कचर्याची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिक मान्युएल फर्नांडिस (बापट) यांनी केली. प्लास्टिक कचर्याबाबत पंचायत जनजागृती करीत नसल्याबद्दल मार्सेलिन फर्नांडिस यांनी नाराजी व्यक्त केली. गतिरोधक ठराव ग्रामस्थांच्या ठरावानुसार पाठविण्यात आले. अलीकडे संबंधित खात्याने पाहणी केल्याची माहिती सचिवांनी दिली. या वेळी उपसरपंच प्रदीप नाईक, पंचसदस्य इनासियो डिसोझा, प्रणाली वायंगणकर, हेर्कुलाना रॉड्रिग्स, अनंत गडेकर, प्रकाश नाईक, रामचंद्र केरकर, नियुक्त पंच हरिजन, गट विकास खात्याचे निरीक्षक संतोष नाईक उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थ आलेसिन रॉड्रिग्स, संदीप वायंगणकर, टोनी डिमेलो, दिगंबर कोरकणकर, बॉस्को, संजय नाईक, मान्युएल फर्नांडिस आदींनी चर्चेत भाग घेतला. सरपंच सुवर्णा ठाकूर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)