पान ७ - हरमल बालहक्क समितीची बैठक

By admin | Published: July 22, 2015 12:34 AM2015-07-22T00:34:15+5:302015-07-22T00:34:15+5:30

मांद्रे : हरमल बालहक्क समितीची बैठक हरमल पंचायत कार्यालयात झाली. यात विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. समितीचे सचिव लक्ष्मण ओटवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला चिल्ड्रन राईट इन गोवाच्या स्नेहल साळगावकर, सरस्वती शेटकर, अंगणवाडीसेविका लता वस्त, विद्यार्थी प्रतिनिधी स्वान फर्नांडिस, श्रुती ठाकूर, रिचा नाईक, सनीश देशपांडे, साईली शेटकर उपस्थित होते.

Page 7 - Meeting of Harman Balhak Committee | पान ७ - हरमल बालहक्क समितीची बैठक

पान ७ - हरमल बालहक्क समितीची बैठक

Next
ंद्रे : हरमल बालहक्क समितीची बैठक हरमल पंचायत कार्यालयात झाली. यात विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. समितीचे सचिव लक्ष्मण ओटवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला चिल्ड्रन राईट इन गोवाच्या स्नेहल साळगावकर, सरस्वती शेटकर, अंगणवाडीसेविका लता वस्त, विद्यार्थी प्रतिनिधी स्वान फर्नांडिस, श्रुती ठाकूर, रिचा नाईक, सनीश देशपांडे, साईली शेटकर उपस्थित होते.
बैठकीत हरमल पंचायत क्षेत्रातील बालकांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी बालहक्कसमितीने पेडणे पोलीस स्थानकावर जाऊन पोलीस निरीक्षकांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. दि. २६ रोजी सकाळी ११.३० वा. त्यांना भेटण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
अवर लेडी ऑफ माउंट कार्मेल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बालरथ एकच असल्याने वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागते. संबंधित खात्याकडे या विद्यालयाने जादा बालरथाची व्यवस्था करण्याची मागणी करूनही अद्याप याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या समस्येसंदर्भात पाठपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हरमल पंचायत क्षेत्रातील नवीन मुलांना बालपंचायतीवर काम करण्याची संधी देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या वेळी स्नेहल साळगावकर व सरस्वती शेटकर यांनी बालपंचायतीचे हक्क, कार्यपद्धती, बाल कायदे, बालसमस्यांची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले. लता वस्त, लक्ष्मण ओटवणेकर, सनीश देशपांडे, श्रुती ठाकूर, स्वान फर्नांडिस यांनी सूचना केल्या. समितीची पुढील बैठक रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. हरमल पंचायत कार्यालयात घेण्याचे ठरले. सचिव लक्ष्मण ओटवणेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
फोटो : हरमल बालहक्क समितीच्या बैठकीस उपस्थित सरस्वती शेटकर, स्नेहल साळगावकर, लता वस्त, लक्ष्मण ओटवणेकर व विद्यार्थी.
(२१०७ एमएपी ०५-०७जेपीजी)

Web Title: Page 7 - Meeting of Harman Balhak Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.