सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:05 IST2025-04-24T16:04:16+5:302025-04-24T16:05:52+5:30
Pahalgam Attack: पाकिस्तानची सीमा हैदर ही आपल्या मुलांना सोबत घेऊन नेपाळमार्गे भारतात आली होती. २०२३ मध्ये तिने अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता.

सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरात लोकांमध्ये पाकिस्तानविरोधात राग आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडून जाण्यास सांगितले आहे, त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. अशातच सीमा हैदर चर्चेत आली आहे. तिला देखील नेटकरी देश सोडून जाण्यास सांगत आहेत.
पाकिस्तानची सीमा हैदर ही आपल्या मुलांना सोबत घेऊन नेपाळमार्गे भारतात आली होती. २०२३ मध्ये तिने अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता. फेसबुकवर गेम खेळता खेळता रबूपुराच्या सचिन मीणा याच्या प्रेमात पडली आणि पतीला सोडून ती मुलांसह भारतात आली. तिला पाकिस्तानला पाठवा असा सूर नेटकऱ्यांनी आळविला आहे. प्रसारमाध्यमांनी सीमाला याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला परंतू तिने यावर काही उत्तर दिले नाही.
सीमा हैदर चार पाकिस्तानी मुलांना घेऊन भारतात आली होती. इथे तिने सचिनसोबत संसार थाटला होता. या दोघांना १८ मार्चला मुलगी झाली आहे. या मुलीचे नाव मीरा असे ठेवण्यात आले आहे. सीमासोबत त्याने हिंदू पद्धतीने लग्न केले होते. मीरा ही सीमाची पाचवी तर भारतातील पहिले अपत्य आहे.
सीमा पाकिस्तानला जाणार की नाही...
सीमाने फसविल्याने सीमाचा पती तिकडे संतापलेला आहे. भारत सरकारकडे त्याने अनेकदा सीमाला आपल्या हवाली करावे अशी मागणी केली आहे. अशातच सीमा हैदर पाकिस्तानला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आह, परंतू सीमा पाकिस्तानला जाणार नाही. कारण तिच्यावर इथे खटला सुरु आहे. यामुळे हा नियम तिच्यावर लागू होत नाही, असे रबुपुराचे पोलीस उपनिरीक्षक हरेंद्र मलिक यांनी म्हटले आहे.
सीमाचे वकील एपी सिंह यांनी देखील ती जाणार नसल्याचे म्हटले आहे. ती न्यायालयाच्या सर्व आदेशांचे पालन करत आहे. भारतात ती मुलांसह शरणार्थी म्हणून आहे. पाकिस्तानात तिला मारण्याची धमकी देत होते, दहशतवादी हल्ल्यासारखीच ती परिस्थिती होती, असे त्यांनी म्हटले आहे.