Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 11:03 IST2025-04-23T11:02:59+5:302025-04-23T11:03:40+5:30

Pahalgam Kashmir News in Marathi: काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अनेक पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. यात २६ जणांचा मृत्यू झाला आहेत, तर काही जखमी झाले आहेत. त्या सगळ्यांची नावे समोर आली आहेत.

Pahalgam Attack Update: Names of those killed by terrorists revealed, 6 from Maharashtra among the dead, who are the injured? | Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?

Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?

Pahalgam Attack news Marathi: काश्मीर खोऱ्यातील आक्रोश आणि दुःख पाहून अवघा देश हळहळला. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केली, तर काही जण जखमी झाले आहेत. मोकळा परिसर असलेल्या बैसरन घाटीतच दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरलं. या घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला असून, महाराष्ट्रातील ६ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर १७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्येही महाराष्ट्रातील काही नागरिकांचा समावेश आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पहलगाममधील बैसरन घाटी येथे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी नाव विचारून आणि धार्मिक ओळख परेड करून फक्त पुरूष पर्यटकांवरच गोळ्या झाडल्या. यात २६ जणांचा मृत्यू झाला. 

मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ नागरिक कोण?

जी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे, त्यानुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, तर रायगडमधील दिलीप देसले, ठाणे जिल्ह्यातील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा समावेश आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ला: मृत्यू झालेल्यांची नावे

दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये कोण?

अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात मुंबईतील सोबेडे पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांच्या मानेवर गोळी झाडण्यात आली आहे. तर पनवेल येथील माणिक पटेल हे किरकोळ जखमी झाले आहेत. एस. भालचंद्र, हर्षा जैन आणि निकिता जैन यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

Web Title: Pahalgam Attack Update: Names of those killed by terrorists revealed, 6 from Maharashtra among the dead, who are the injured?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.