सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:16 IST2025-04-23T18:15:10+5:302025-04-23T18:16:14+5:30
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर अजित डोभाल यांनी सुत्रे हाती घेतली आहेत.

सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधी आणखी बिघडले आहेत. या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानलाभारताकडून हल्ल्या होण्याची भीती सतावत आहे. ही भीती रास्त आहे, कारण जेव्हा पुलवामा हल्ला झाला, तेव्हाही भारताने तात्काळ पाकवर हवाई हल्ला केला होता. त्यामुळेच आता पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यानंतर आता एनएसए अजित डोभाल कामाला लागले आहेत.
अजित डोवाल एका नवीन रणनीतीअंतर्गत पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहेत. 2014 मध्ये एका विद्यापीठात दिलेल्या भाषणादरम्यान अजित डोभाल यांनी पाकिस्तानविरुद्ध 'बचावात्मक हल्ल्याची' रणनीती स्पष्ट केली होती. त्यांचा असा विश्वास होता की, भारताचा आतापर्यंतचा दृष्टिकोन प्रामुख्याने बचावात्मक राहिला आहे, ज्यामध्ये आपण फक्त पाकिस्तानच्या कृतींना प्रत्युत्तर देतो. या रणनीतीमध्ये भारताला नेहमीच नुकसान सहन करावे लागते.
पाकिस्तानने 'मुंबई' केली, तर त्यांनी 'बलुचिस्तान' गमावण्यास तयार असले पाहिजे, असे डोभाल म्हणाले होते. त्यांचा संदेश असा होता की, भारताने आता केवळ बचावात्मक राहण्याऐवजी पाकिस्तानच्या अंतर्गत कमकुवतपणावर हल्ला करावा. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करणेदेखील समाविष्ट आहे. तसेच, अफगाणिस्तानच्या माध्यमातूनही पाकिस्तानवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
आता कालच्या पहलगाम हल्ल्यानंतर डोभाल यांनी या रणनीतीअंतर्गत पाकिस्तानला वेगळे करण्याची योजना आखल्याचे मानले जाते. असेही म्हटले जात आहे की, पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण यावेळी तिथले लोकही पाकिस्तानी सैन्यावर खूप संतापले आहेत. पाकिस्तानमध्ये सर्वत्र सरकारविरुद्ध खूप गदारोळ सुरू आहे.
भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक देशांचा पाठिंबा आहे. पाकिस्तानचा आवडता चीन देखील भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता, पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याची ही सर्वात योग्य वेळ आहे, असे म्हणता येईल. आता डोभाल यांच्यासारखा अनुभवी अधिकारी पाकिस्तानला कडक संदेश देण्याची रणनिती आखत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भारत मोठी कारवाई करू शकते.