Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:23 IST2025-04-24T14:22:52+5:302025-04-24T14:23:17+5:30
Pahalgam Terror Attack Viral Video: एक नवविवाहित जोडपं काश्मीरच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये नाचताना आणि हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांचा असल्याचा दावा करण्यात आला. पण आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागचं सत्य समोर आलं आहे.

Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात विनय नरवाल याचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर याच दरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक नवविवाहित जोडपं काश्मीरच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये नाचताना आणि हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांचा असल्याचा दावा करण्यात आला. पण आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागचं सत्य समोर आलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ नेव्ही ऑफिसर विनय नरवाल आणि त्याच्या पत्नीचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र तो प्रत्यक्षात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यशिका शर्मा आणि आशिष सहरावत यांचा आहे. त्यांनी स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे.
"आम्ही जिवंत आहोत कारण आम्ही त्या हल्ल्यात नव्हतो. पण आमचा व्हिडीओ हल्ल्यात मृत्यू झालेल्या नेव्ही ऑफिसरचा असल्याचा दावा करून कसा व्हायरल केला जात आहे हे आम्हाला माहित नाही. सर्वत्र मीडिया चॅनेलवर आमचं फुटेज दाखवून ते त्या दुःखद घटनेशी जोडलं जात आहे."
"या खोट्या बातमीमुळे आम्हाला सोशल मीडियावर अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला, तसेच आमचं कुटुंब आणि जवळचे लोकही घाबरले. बरेच लोक 'RIP' असं लिहित आहेत, पण आम्ही पूर्णपणे सुरक्षित आणि जिवंत आहोत" असं यशिकाने म्हटलं आहे.
हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
"अनेक चॅनेल्स आणि सोशल मीडिया पेजनी हा विनय नरवाल आणि त्याच्या पत्नीचा शेवटचा व्हिडीओ असल्याचं सांगून खोटं सांगून आमचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. कृपया या व्हिडिओचा चुकीचा वापर करणाऱ्या पेजची तक्रार करा" असं या व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनही लिहिलं आहे.
"माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
संपूर्ण घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना यशिका शर्मा आणि आशिष सहरावत म्हणाले की, "आमच्यासाठी ते भीतीदायक होतं, पण ज्या कुटुंबाने आपल्या प्रियजनांना गमावलं आणि नंतर दुसऱ्याचा व्हिडीओ पाहिला जो त्यांना त्यांच्या प्रियजनांशी जोडला जात होता, त्यांच्यासाठी ते किती वेदनादायक असेल याची कल्पना करा."