भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:30 IST2025-04-24T15:29:26+5:302025-04-24T15:30:16+5:30
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही, असा पवित्रा सरकारने घेतला आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकारने पाकिस्तानी दूतावास बंद केले असून, सिंधू पाणी करारदेखील रद्द केला आहे. या सर्व कारवाईसोबतच युद्धाचा संशयही व्यक्त केला जातोय. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा युद्ध झाले, तर जगभरातील कोणते देश कोणाच्या बाजूने असतील?
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, तर भारताला दोन आघाड्यांवर लढावे लागू शकते. चीन आणि पाकिस्तानची मैत्री सर्वश्रृत आहे. अशा परिस्थितीत भारताला दोन्ही देशांचा सामना करावा लागू शकतो. असे झाले तर भारतासाठी ही खूप कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण, चीन सर्व गोष्टींचा विचार करुन भारत-पाक युद्धात उतरले. 1962 मध्ये चीनने भारताला युद्धात हरवले होते, पण आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. आता भारताची ताकदही पूर्वीपेक्षा वाढली आहे.
कोणते देश भारताला पाठिंबा देतील?
सध्या भारत जगात एक बलवान देश म्हणून उदयास आला आहे. भारताचे बहुतांश मोठ्या देशांशी खूप चांगले संबंध आहेत. यामध्ये सर्वात मोठा देश अमेरिका आहे, ज्याला जगातील सर्वात मोठी शक्ती म्हटले जाते. दोन्ही देश एकमेकांशी विविध प्रकारचे व्यापार करतात. गेल्या काही वर्षांत पाकिस्ताननेही अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु दहशतवाद आणि इतर गोष्टींमुळे अमेरिका पाकिस्तानला फारसे महत्त्व देत नाही. अशा परिस्थितीत अमेरिका भारताच्या बाजूने येऊ शकतो.
रशिया आणि इस्रायलदेखील भारताच्या बाजूने
अमेरिकेनंतर, भारताला जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शक्ती असलेल्या रशियाकडूनही पाठिंबा मिळू शकतो. गेल्या अनेक दशकांपासून रशिया आणि भारताचे संबंध खूप चांगले आहेत. भारताने रशियाकडून अनेक मोठी शस्त्रे खरेदी केली असून, भविष्यातही असे करार सुरू राहतील. यापूर्वीही रशियाने पाकिस्तानसोबतच्या युद्धात उघडपणे भारताला पाठिंबा दिला होता. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंधही मजबूत आहेत. कारगिल युद्धादरम्यान इस्रायलने भारताला खूप मदत केली होती. आताही युद्ध पेटल्यास इस्रायलचा भारताला पाठिंबा असेल.
पाकिस्तानच्या बाजूने कोण येणार?
अशा परिस्थितीत चीन वगळता दुसरा कोणताही मोठा देश पाकिस्तानला मदत करणार नाही. पाकिस्तानने भारताशी पंगा घेतला तर त्याला फक्त चीनवर अवलंबून राहावे लागेल. पाकिस्तान मुस्लिम देशांकडूनही मदत मागू शकतो, परंतु कोणताही इस्लामिक देश भारताविरुद्ध युद्धसदृश परिस्थिती निर्माण करेल अशी शक्यता खूपच कमी आहे.