पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:38 IST2025-04-24T12:37:48+5:302025-04-24T12:38:56+5:30

Pahalgam terror attack: पाकिस्तानी उच्चायुक्तालयात एका पाकिस्तानी व्यक्तीला जाताना प्रसारमाध्यमांनी पाहिले आणि त्याला घेराव घातला.

Pahalgam terror attack: Pakistan High Commission orders cake for celebration in Delhi; Why? | पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?

पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. सर्वाना पाकिस्तानवर बदला घ्यायचा आहे, अशातच भारत सरकारने ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे. तसेच पाकिस्तानी राजनयिकांना देखील सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. असे असताना दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगामध्ये सेलिब्रेशनसाठी केक मागविण्यात आला आहे. 

मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला

पाकिस्तानी उच्चायुक्तालयात एका पाकिस्तानी व्यक्तीला जाताना प्रसारमाध्यमांनी पाहिले आणि त्याला घेराव घातला. त्याच्या हातात केकचा बॉक्स होता. त्याला माध्यमांच्या प्रतिनिधींनी हा केक कशासाठी नेला जात आहे, २६ लोक मारले गेलेत त्याचे काही वाईट वाटतेय का, तसेच कशाचे सेलिब्रेशन पाकिस्तान अॅम्बेसीमध्ये केले जाणार आहे, असे प्रश्न विचारले. परंतू, या पाकिस्तानीने एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. 

त्याची वाट अडविण्यात आली होती. तरीही तो बाजु बाजुने वाट काढत पुढे जात होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोक प्रचंड चिडले आहेत. काही लोक याला पहलगाम हल्ल्याशी देखील जोडत आहेत. जेव्हा देशात अशी वेदनादायक घटना घडली आहे, तेव्हा पाकिस्तान उच्चायुक्तालयात कशाचा आनंद साजरा केला जात आहे, यामुळे पाकिस्तानचे कट उघड होत आहेत, असे नेटकरी म्हणत आहेत. 

दरम्यान दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयासमोरील बॅरिकेड्स हटविले आहेत. तसेच त्या जागी रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात केली आहे. मोठा पोलीस फौजफाटा पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानला जाणारे पाणी रोखले आहे. तसेच पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर भारताने पाकिस्तानी सरकारचे एक्स अकाऊंट भारतासाठी ब्लॉक केले आहे. तसेच पाकिस्तानची https://pakistan.gov.pk/ ही वेबसाईट देखील ब्लॉक करण्यात आली आहे.

दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीच्या सुरुवातीला, काँग्रेस नेत्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात अँटी टेररिझम अॅक्शन फोरम आणि भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने केली. 

Web Title: Pahalgam terror attack: Pakistan High Commission orders cake for celebration in Delhi; Why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.