दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 22:45 IST2025-04-23T22:45:27+5:302025-04-23T22:45:37+5:30

Pahalgam Terror Attack : भारतासाठी कालचा दिवस (22 एप्रिल 2025) काळा दिवस होता.

Pahalgam Terror Attack: Remote area, no security arrangements...Why did terrorists choose Pahalgam for the attack? | दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?

दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?

Pahalgam Terror Attack : भारतासाठी कालचा दिवस (22 एप्रिल 2025) काळा दिवस होता. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, आता अनेकांना प्रश्न पडतोय की, दहशतवाद्यांनी पहलगाममधील "मिनी स्वित्झर्लंड" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅली परिसरालाच का लक्ष्य केले? याचे उत्तर त्या भागाच्या भूगोलात लपले आहे. 

पहलगाममधील बैसरन हे एक मोठे मैदान आहे. हे शहराच्या शहराच्या आग्नेय भागात स्थित असून, नद्या, घनदाट जंगले आणि चिखलाच्या प्रदेशातून जाणाऱ्या वळणदार ट्रेक मार्गंनी वेढलेले आहे. ट्रेकचा बराचसा भाग वाहनांसाठी योग्य नाही. मार्गाचे काही भाग अत्यंत निसरडे आहेत, एक छोटीशी चूकही पर्यटकांना खोल दरीत पाडू शकते.

पहलगामहून पर्यटक पायी आणि घोड्यावर बसून गवताळ प्रदेशात पोहोचतात. एखाद्या तरुणाला पहलगाम ते बैसरण चालण्यासाठी सुमारे एक तास लागेल. हा भाग पूर्णपणे वेढलेला असल्यामुळे येथे पोहोचणे सोपे नाही. पण, बैसरनमध्ये दुकान चालवणारे स्थानिक लोक अनेकदासायकली वापरतात. अशा कठीण भूभागामुळे आपत्कालीन मदत करणाऱ्यांना किंवा सुरक्षा दलांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी किमान 30-40 मिनिटे लागतात. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 5 किमी मार्गावर एकही पोलिस चौकी नाही. अडचणी असूनही दररोज शेकडो पर्यटक या 30 एकरच्या बैसरणला भेट देतात. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या संलग्न द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) च्या हल्लेखोरांनी त्यांच्या स्थानिक साथीदारांच्या मदतीने परिसराची रेकी केली होती. हल्ल्यानंतर घनदाट जंगलात लपण्याची ठिकाणे उभारली होती. याचाच फायदा घेत दहशतवादी पळून गेले.

 

Web Title: Pahalgam Terror Attack: Remote area, no security arrangements...Why did terrorists choose Pahalgam for the attack?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.