Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:14 IST2025-04-24T13:14:13+5:302025-04-24T13:14:46+5:30
Pahalgam Terror Attack : दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील शुभम द्विवेदीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. शुभमची पत्नी ऐशान्या अवस्था अत्यंत वाईट आहे.

Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील शुभम द्विवेदीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. शुभमची पत्नी ऐशान्या अवस्था अत्यंत वाईट आहे. ती वारंवार म्हणत आहे की, "माझ्या शुभमला परत आणा. शुभमचं लग्न होऊन काही महिनेच झाले होते. दोघांनीही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतं पण दहशतवादी हल्ल्याने त्यांच्या आयुष्यातील सर्व आनंद हिरावून घेतला."
दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ऐशान्या आणि शुभम कॅफेमध्ये बसले होते. दोघांनीही मॅगी ऑर्डर केली होती. शुभम खुर्चीवर बसून आजूबाजूच्या दृश्यांचा आनंद घेत होता, तर ऐशान्या जवळच उभी होती. एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि शुभमला विचारलं की, तू हिंदू आहेस की मुस्लिम? कलमा वाचून दाखव. दहशतवाद्यांनी शुभमच्या डोक्यात गोळी झाडली. शुभमचा जागीच मृत्यू झाला.
"भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
"माझ्या शुभमला परत आणा”
"मला काहीही समजत नाही, जे काही घडलं ते माझ्या डोळ्यासमोर घडलं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आम्ही दोघे एकत्र गेलो, पण तो एकटा कसा गेला? त्याने मला वचन दिलं की तो नेहमीच माझ्यासोबत राहील. माझ्या शुभमला परत आणा, तो एक चांगला माणूस होता. त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
"लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
“मी माझं दुःख कोणाला सांगू?"
"आता मी माझ्या गोष्टी कोणासोबत शेअर करू, मी माझं दुःख कोणाला सांगू? आम्ही दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी होतो. या घटनेने सर्व काही उद्ध्वस्त झालं. जर आम्ही काश्मीरला गेलो नसतो तर माझा शुभम आज माझ्यासोबत असता. मी काश्मीरहून परत आले, पण माझा शुभम कधीच परत येणार नाही" असं ऐशान्याने म्हटलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुभमच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.