चीन सीमेवर भारत ठेवणार स्नो स्कूटर्सद्वारे गस्त
By admin | Published: February 13, 2017 12:32 AM2017-02-13T00:32:17+5:302017-02-13T00:32:17+5:30
भारत-चीन सीमेवर इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) यापुढे अत्यंत स्नो स्कूटर्सवर गस्त घालताना दिसतील. या स्कूटर्स
नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) यापुढे अत्यंत स्नो स्कूटर्सवर गस्त घालताना दिसतील. या स्कूटर्स अमेरिकेतील कंपनीने बनवल्या असून पहिल्या पाच स्कूटर्स लडाख, उत्तराखंड आणि सिक्कीम भागात सेवेत रुजूही झाल्या आहेत.
या स्कूटर्स आता पलीकडे असलेल्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हालचालींवर लक्ष ठेवतील. सुमारे एक कोटी रुपये किमतीच्या या आधुनिक स्कूटरवर चालवणारा व त्याच्यासोबत एक अशा दोघांना रायफल आणि दारुगोळा वाहून नेता येईल. ही स्कूटर डोंगराळ भागात ४५ अंशांच्या उतारातही वापरता येईल. बर्फ कापणे आणि त्यातून सहजपणे पुढे जाता येईल यासाठीचे २७८ किलो वजनाचे यंत्र वाहून नेण्यासाठी चेनकेसचा या स्कूटरला पाठिंबा आहे. ३,४४८ किलोमीटरच्या सीमेचे संरक्षण करण्यासाठी आयटीबीपीच्या क्षमतेमध्ये यामुळे वाढ होणार आहे. अशा प्रकारच्या स्कुटर्स जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पर्यटक तसेच संरक्षण दले प्रशिक्षणासाठी वापरतात.