पालखी मुक्काम जोड
By Admin | Published: July 11, 2015 12:15 AM2015-07-11T00:15:18+5:302015-07-11T00:15:18+5:30
ज्ञानेश्वर माऊलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिराजवळ रात्री दहा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास पोचली. रथातील पादुका आरतीनंतर या मंदिरात मुक्कामासाठी नेण्यात आल्या. रात्री दहानंतरही उत्साही भाविक पालखी मार्गावर दुतर्फा उभे होते. पालखी रथाचे आगमन होताच तेथील चौकात एकच गर्दी उसळली.
ज ञानेश्वर माऊलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिराजवळ रात्री दहा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास पोचली. रथातील पादुका आरतीनंतर या मंदिरात मुक्कामासाठी नेण्यात आल्या. रात्री दहानंतरही उत्साही भाविक पालखी मार्गावर दुतर्फा उभे होते. पालखी रथाचे आगमन होताच तेथील चौकात एकच गर्दी उसळली.तुकोबांची पालखी साडेनऊच्या सुमारास नाना पेठेतील निवडुंगे विठोबा मंदिराजवळ पोचली. आरतीनंतर पादुका मंदिराच्या गाभा-यात नेण्यात आल्या. जेथे जागा मिळेल तेथे आश्रय घेत वारक-यांची सकाळपासून चालणारी पाऊलेही विसावली. काही ठिकाणी रात्री उशीरापर्यंत जेवणावळी सुरु होत्या. भजन, किर्तन आणि भक्तिगीतांच्या स्वरांच्या लहरी ऐकतच पंढरीकडे जाणारी लाखो पाऊले नाना , भवानी या पेठांसह शहरात जागोजागी निद्रादेवीच्या अधिन झाली.