पाकच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर, सीमाचौक्या केल्या नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:34 AM2018-01-23T01:34:08+5:302018-01-23T01:34:21+5:30
गेले काही दिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मूच्या सीमेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या तोफांच्या मा-यास भारताने चौख प्रत्युत्तर दिले असून, सीमेच्या पलीकडील पाकिस्तानच्या काही चौक्या, तसेच दारूगोळा व इंधन साठविलेली काही कोठारे उद्ध्वस्त केली आहेत.
नवी दिल्ली : गेले काही दिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मूच्या सीमेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या तोफांच्या मा-यास भारताने चौख प्रत्युत्तर दिले असून, सीमेच्या पलीकडील पाकिस्तानच्या काही चौक्या, तसेच दारूगोळा व इंधन साठविलेली काही कोठारे उद्ध्वस्त केली आहेत.
पाकिस्तानच्या लष्करावर भारतीय सैन्याने गेल्या चार दिवसांत ९ हजार उखळी तोफगोळ््यांचा मारा केला आहे. पाकिस्तानी सैनिक ज्या चौक्यांच्या आडोशाने मारा करीत होते, त्यातील काही चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.
बीएसएफ व केंद्रीय गृहखात्याच्या सूत्रांनी सांगितले की, जम्मू विभागातील १९० किमी लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानने गेल्या गुरुवारपासून सुरू केलेल्या मा-यात ५ भारतीय जवान शहीद झाले, तर ७ नागरिक मरण पावले. याखेरीज ६० भारतीय नागरिक जखमी झाले होते.
पाकिस्तानने चालविलेल्या माºयाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. कितीही विपरित परिस्थिती आली, तरी भारताचे शिर खाली झुकू दिले जाणार नाही, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी व्यक्त केला होता. भारत हा आता दुर्बळ देश राहिलेला नाही. जगाची भारताबद्दलची धारणा बदलली आहे, असेही ते म्हणाले होते.
सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिका-याने सांगितले की, जम्मूच्या कांचन भागात आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला. दोनजण जखमी झाले. जम्मूमध्ये नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सिमेनजीकच्या शाळा सातत्याने बंद आहेत.
या अधिकाºयाने सांगितले की, परगवाल, मठ, आरएसपुरा, अरनिया आणि रामगढ सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर रात्रभर गोळीबार होत होता. पाकिस्तानी जवानांनी काल रात्री जम्मूच्या कांचक सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा गोळीबार केला.